For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : धुळदेव हद्दीत हातभट्टी अड्ड्यावर छापा

01:01 PM May 30, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara news   धुळदेव हद्दीत हातभट्टी अड्ड्यावर छापा
Advertisement

म्हसवडः म्हसवड पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ९ च्या दरम्यान धुळदेव हद्दीतील घोडेखोर परिसरातसुमारे २०० लिटर हातभट्टी दारू निर्मिती अवैधरित्या काढणाऱ्या माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात येऊन १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisement

दारू निर्मिती करणऱ्याने मात्र पलायन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुळदेव गावच्या हद्दीत घोडेखोर परिसरात जुबेरखान दोहेरखान पठाण (रा. पठाणवस्ती, चांदपुरी, ता. माळशिरस) हा हातभट्टी दारूची निर्मिती करत असल्याची माहिती मिळताच संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इंदलकर, अनिल वाघमोडे, अस्वले, सुमित बोडरे आदीनी छापा टाकून, दारु तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य व रसायन जप्त करण्यात आले.

यामध्ये २०० लिटर क्षमतेचे चार लोखंडी बॅरलमध्ये ८०० लिटर रसायन, ७५ लिटर रसायन, १८० मिलीच्या बाटल्यांमधील हातभट्टी दारू तसेच २० लिटर क्षमतेचा कॅन यांचा समावेश असून १८ हजार ५०० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.