For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : माणगंगा नदी पुलाखाली सापडलेल्या दिघंचीच्या इसमाचा मृत्यू हृदयविकाराने

01:27 PM Jun 10, 2026 IST | NEETA POTDAR
satara news    माणगंगा नदी पुलाखाली सापडलेल्या दिघंचीच्या इसमाचा मृत्यू हृदयविकाराने
Advertisement

म्हसवड : येथील दहिवडी रस्त्यावरील माणगंगा नदीच्या पुलाखाली अंदाजे ४० ते ४३ वर्षे वयाच्या अज्ञात पुरुषचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मृताची ओळख पटावी यासाठी शोधमोहीम सुरू केली होती. हा मृतदेह रामचंद्र नामदेव रणदिवे (रा. दिघंची, जि. सांगली) यांचा असल्याची ओळख पटली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, त्यांचा मृतदेह हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. म्हसवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोमवारी ८ जून रोजी साडेबाराच्या दरम्यान सचिन दिलीप लोखंडे हे विरकरमळवी येथील आपल्या घरून म्हसवडकडे माणगंगा नदीच्या पुलावरून येत होते.
त्यावेळी पुलाखाली एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. ही वार्ता शहरात पसरताच बघ्यांची गर्दी माणगंगा नदीच्या पुलावर झाली.
पोलिसांनी ॲम्ब्युलन्स बोलवून प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह तपासणीसाठी नेण्यात आल्या. तेथे डॉ. कुलकर्णी यांनी सदर व्यक्ती मृत असल्याचे सांगितले.
त्यानंतर मृतदेह दहिवडी येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोशल मीडियाच्या माध्यमातून मृत व्यक्तीची ओळख पटावी यासाठी प्रयत्न सुरू केले.
मंगळवारी मृत व्यक्ती सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील रामचंद्र नामदेव रणदिवे समजले. ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, रणदिवे यांचे आई, बडील व दोन्ही भाऊ मयत झाले असल्याने रणदिवे एकटेच होते. मिळेल तेथे खात होते.
शनिवारी रात्री पावसापासून बचाव करण्यासाठी ते पुलाखाली बसले होते. त्या ठिकाणीच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हसवड पोलिसांनी सांगितले.
Advertisement
Advertisement
Tags :

.