म्हसोबा देवालय आझाद मंडळाच्या नूतन वास्तूचे भूमीपूजन
आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते कार्यक्रम : मान्यवरांची उपस्थिती
कोल्हापूर प्रतिनिधी
गुजरी कॉर्नर येथील आझाद गल्लीतील श्री म्हसोबा देवालय आझाद मंडळाच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन दीपावली पाडव्याच्या दिनी उत्साहात झाले. आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार जाधव यांनी उपस्थित सर्वांना आझाद गल्लीतील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर श्री म्हसोबा देवालय आझाद मंडळाच्या नूतन वास्तू उभारणीसाठी भरीव निधी देण्याची ग्वाही दिली होती. आण्णांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता त्यांच्या पत्नी आमदार जयश्री जाधव यांनी केली. भरीव निधी दिला. त्यानुसार आता मंडळाच्या नूतन वास्तूच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे.
आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते कुदळ मारून भूमीपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख तानाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश लिंग्रस, माजी नगरसेवक ईश्वर परमार, मेहजनबी सुभेदार, किरण कोरडे, सौ. कोरडे, अजित पवार, उद्योजक जयेश ओसवाल, शिवराज गायकवाड यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष प्रकाश लांडगे, उपाध्यक्ष अभिजित ओतारी, सचिन घोटणे, विराज ओतारी, दिलीप इंगवले, विजय करजगार, संजय करजगार, सुनील पाटील, नंदकुमार ओतारी, प्रकाश कोतमिरे, मोहन पोवार, शिवप्रसाद कोरेगावकर, विनायक कोरडे, राजेश इंगवले, संतोष डेंगरे, सागर गांधी, प्रथमेश चिंचवडकर, मयूर देसाई, ओंकार इंगवले, मयूर कोरडे, कुणाल पवार, शुभम इंगवले, गणेश भोपळे यांच्यासहभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.