For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हादईप्रश्नी सुनावणी टळली

10:05 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
म्हादईप्रश्नी सुनावणी टळली
Advertisement

पणजी : म्हादई नदीच्या पाण्याच्या वाटपावर आयोगाने दिलेल्या निवाड्यास गोव्याने दिलेल्या आव्हान अर्जावर सर्वोच्च न्यायालयात काल बुधवारी होणारी सुनावणी टळली आहे. गोव्याची याचिका बुधवारी 10 व्या क्रमांकावर होती, मात्र संध्याकाळपर्यंत 4 क्रमांकाची सुनावणी सुऊ राहिली. त्यामुळे आता क्रमवारीनुसार गोव्याची सुनावणी आज गुऊवारी होणार असल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी ’तऊण भारत’शी बोलताना दिली. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी बुधवार आणि गुऊवार अशा दोन तारखा जाहीर केलेल्या होत्या. त्यानुसार गोव्याच्या वकिलांचे पथक मंगळवारीच दिल्लीत दाखल झालेले आहे. परंतु, काल सुनावणी झालेली नसल्याने काहीशी निराशा झाली. म्हादईसंबधी पाच अर्जांवर एकत्रितरीत्या सुनावणी होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात गोव्याची बाजू कर्नाटकपेक्षा भक्कम आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी कशाप्रकारे बेकायदेशीररीत्या वळवले त्याबाबतचे सर्व पुरावे गोव्याने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले आहेत. शिवाय या प्रकरणासंदर्भातील इतर कागदपत्रेही दिलेली आहेत. कर्नाटकने मात्र आवश्यक ती कागदपत्रे न्यायालयात सादर केलेली नाहीत. त्यामुळे म्हादईप्रश्नी गोव्याचा विजय निश्चित आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.