For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चतुर्थीनंतर मगोची राजकीय रणनीती स्पष्ट होणार; 12 मतदारसंघांत सर्वेक्षण : वीज मंत्री सुदिन ढवळीकर

12:25 PM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
चतुर्थीनंतर मगोची राजकीय रणनीती स्पष्ट होणार  12 मतदारसंघांत सर्वेक्षण   वीज मंत्री सुदिन ढवळीकर
Advertisement

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे (मगो) राज्यातील 12 मतदारसंघात सर्वेक्षण करण्याचे काम चालू आहे. फोंडा, सांखळी या ठिकाणी मगोपची स्थिती मजबूत असल्याचा दावा मगोचे नेते वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. सर्वेक्षणाचे निकाल गणेशचतुर्थीनंतर मिळणार असून त्यानंतर पक्षाचे पुढील राजकीय धोरण आखणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आघाडीचा धर्म पाळूनच पुढे जाणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

Advertisement

पणजीत प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मगोपची स्थिती कुठे चांगली, मजबूत व कमकुवत कमकुवत आहे याचा आढावा घेण्यासाठी सर्वेक्षण चालू आहे. राजकीय समीकरणे त्या मतदारसंघात कशी आहेत यावरही मगो पक्ष विचारमंथन करणार असून मगोपची संघटनात्मक ताकदीची पडताळणी त्यातून करण्याचा हेतू आहे. अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय केले जातील, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

कोणते मतदारसंघ मगोसाठी पोषक आहेत तसेच मगोची मतदारसंख्या त्या 12 मतदारसंघात किती आहे? याचाही अभ्यास त्या सर्वेक्षणातून होणार आहे. हे सर्वेक्षण जरी झाले तरी आघाडीमधील घटक पक्षात समन्वय ठेवून पुढील रणनिती निश्चित करण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी नमूद केले.

Advertisement

सध्या मगो पक्षाने 40 पैकी फक्त 12 मतदारसंघच सर्वेक्षणासाठी निवडले आहेत. पूर्वी जे मगो पक्षाचे बालेकिल्ले होते, त्याच मतदारसंघात पक्षाची मते किती आहे, याचा अंदाज सर्वेक्षणातून घेऊन पुढे जायचे आहे, असेही ढवळीकर म्हणाले.

Advertisement
Tags :

.