एमजी विंडसर लवकरच बाजारात येणार
जेएसडब्ल्यू आणि एमजी मोटार इंडियाकडून टीझर सादर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिग्गज कंपन्या जेएसडब्ल्यू आणि एमजी मोटार इंडिया यांनी त्यांच्या आगामी क्रॉसओवर युटिलिटी व्हेईकल (सीयूव्ही) विंडसरचा आणखी एक टीझर जारी केला आहे. व्हिडिओ 15.6-इंचाचा ग्रँडह्यू टच डिस्प्ले दाखवतो, जो त्याच्या विभागातील सर्वात मोठा आहे. हे ड्रायव्हिंग अनुभव सुधारण्यासाठी डिझाइन केले आहे, ज्यामध्ये मनोरंजन, गेमिंग आणि नेव्हिगेशनचे वैशिष्ट्या आहे. जेएसडब्ल्यू आणि एमजीच्या भागीदारीतील ही भारतातील पहिली कार असेल. कंपनी या कारला भारतातील पहिली इलेक्ट्रिक सीयूव्ही म्हणत आहे. विंडसर 11 सप्टेंबरला दाखल होण्याची शक्यता आहे. त्याची किंमत 20 लाखांपेक्षा कमी असू शकते. एमजीची नवीन ईव्ही कर्व्ह ईव्ही, नेक्सॉन ईव्ही, एक्सयूव्ही400 सोबत स्पर्धा करेल, असे सांगितले जाते. पॅनारॉमिक ग्लासरूफची सोय या गाडीमध्ये असेल.