For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एमजी मोटर्स इंडियाचा एचपीसीएलसोबत करार

06:29 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
एमजी मोटर्स इंडियाचा एचपीसीएलसोबत करार
Advertisement

चार्जिंग केंद्रांसाठी भागीदारी : कार ग्राहकांची होणार सोय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एमजी मोटर इंडिया यांनी देशातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रांच्या विस्तारासाठी एचपीसीएल यांच्यासोबत (हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड)भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. एचपीसीएलच्या पेट्रोल पंपांवर अधिकाधिक चार्जिंग केंद्रांचा विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे.

Advertisement

या नव्या भागीदारी अंतर्गत एमजी मोटर इंडिया कंपनी राज्य महामार्गांवर तसेच शहरांमध्ये एचपीसीएलसोबत 50 केडब्ल्यू आणि 60 केडब्ल्यू डीसी फास्ट चार्जरची व्यवस्था करणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा दीर्घ पल्ल्याच्या अंतरासाठी वापर करणाऱ्या कार ग्राहकांना या इलेक्ट्रिक चार्जर सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

काय म्हणाले गौरव गुप्ता

एमजी मोटर इंडियाचे मुख्य विकास अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, भारतामध्ये एचपीसीएल आगामी काळामध्ये चार्जिंग सुविधांच्या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देऊ शकणार आहे. देशभरातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना या केंद्रांची सुविधा प्राप्त होऊ शकणार आहे.

5 हजार चार्जिंग केंद्रे स्थापणार

एचपीसीएलचे मुख्य व्यवस्थापक राजदीप घोष म्हणाले, की कंपनीचे जवळपास 22 हजारहून अधिक पेट्रोल पंप देशभरात कार्यरत असून त्या ठिकाणी हरित इंधन उपलब्ध करून पर्यावरणाच्या दृष्टीने सहकार्याचा हातभार लावला जाणार आहे. 2024 च्या डिसेंबरपर्यंत 5000 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रांची स्थापना करण्याचे उद्दिष्ट एचपीसीएलने ठेवले आहे.

Advertisement
Tags :

.