एमजी मोटरची नवी इलेक्ट्रीक कॉमेट लाँच
5 लाखापर्यंत किंमत : 230 किमी देणार मायलेज
वृत्तसंस्था/बेंगळूर
जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया यांनी आपली स्वस्तातील एमजी कॉमेट इलेक्ट्रीक सुधारीत आवृत्तीची कार लाँच केली आहे. आपल्या जुन्या मॉडेलपेक्षा या नव्या मॉडेलमध्ये कंपनीने मोठे बदल केले आहेत. सुधारीत एमजी कॉमेटची किंमत 5 लाख रुपयांच्या आत असणार आहे. सदरची कार ग्राहकांना 11 हजार रुपये भरुन बुक करता येणार आहे. कंपनीच्या अधिकृत संकेत स्थळावर किंवा अधिकृत विक्रेत्याकडे सदरची कार बुक करता येणार आहे. या नव्या गाडीमध्ये एक्झीक्युटीव्ह, एक्साईट, एक्साईट फास्ट चार्ज, एक्सक्लुझीव आणि एक्सक्लुझीव फास्ट चार्ज अशा पाच प्रकारामध्ये ही गाडी सादर करण्यात आली आहे. 4.99 लाख ते 9.80 लाख रुपये कारची किंमत असणार आहे.
या असतील सुविधा
एक्साईट आणि एक्साईट फास्ट चार्ज या प्रकारामध्ये रिअर पार्किंग कॅमेरा आणि पॉवर फोल्डींग आऊटसाईड रिअर व्ह्dयु मिरर अशा सुविधा असणार आहेत. इतर कारमध्ये प्रिमीयम लेदर सीट आणि उत्तम केबीन दिली गेली आहे. चार स्पिकर ऑडिओ सिस्टीमदेखील समाविष्ट असून 17.4 केडब्ल्युएचची बॅटरी दिली गेली आहे. एका चार्जनंतर कार 230 कि.मी. चे अंतर मायलेज पार करु शकणार आहे.