For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एमजी हेक्टर फेसलिफ्ट भारतीय बाजारात दाखल

06:48 AM Dec 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
एमजी हेक्टर फेसलिफ्ट भारतीय बाजारात दाखल
Advertisement

सुरुवातीची किंमत 11.99 लाख ऊपये

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने भारतात त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही हेक्टरचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले. ही कार नवीन डिझाइन क्रोम ग्रिल आणि टच क्रीनमध्ये जेश्चर कंट्रोल सारख्या वैशिष्ट्यांसह अपडेट करण्यात आली आहे.  2025 ची नवीन हेक्टर सुरुवातीला 5-सीटर आणि 7-सीटर आवृत्त्यांमध्ये देण्यात आली होती. 5-सीटर हेक्टरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे आणि 7-सीटर आवृत्तीची किंमत 17.30 लाख रुपये आहे.

Advertisement

या नवीन किमती मर्यादित युनिट्ससाठी आहेत. यानंतर कारची किंमत वाढवली जाईल. ही नवीन पिढीची हेक्टर अपडेट नसल्यामुळे, त्याच्या डिझाइन, केबिन थीम आणि रंग पर्यायांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

कारचे बुकिंग सुरू झाले आहे. भारतात, टाटा हॅरियर, टाटा सफारी, महिंद्रा स्कॉर्पिओ एन, फेसलिफ्ट महिंद्रा एक्सयूव्ही 7एक्सओ आणि ह्युंडाई अल्काझार यांच्याशी ही कार स्पर्धा करेल. सुरक्षिततेचा विचार करता हेक्टरमाध्ये 6 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत व 360 डिग्रीचा कॅमेरा दिला गेला आहे.

Advertisement
Tags :

.