For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूयॉर्कमध्ये ब्रुकलिन ब्रिजला मेक्सिकन जहाजाची धडक

06:55 AM May 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
न्यूयॉर्कमध्ये ब्रुकलिन ब्रिजला मेक्सिकन जहाजाची धडक
Advertisement

दोघांचा मृत्यू , 19 प्रवासी जखमी : जहाजात 250 हून अधिक लोक

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये मेक्सिकन नौदलाचे प्रशिक्षण जहाज कुआउतेमोक पूर्व नदीवरील ब्रुकलिन ब्रिजवर धडकले. न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या म्हणण्यानुसार ही घटना शनिवारी रात्री 8:30 वाजता घडली. जहाजाच्या धडकेमुळे दोघांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाल्याचे न्यूयॉर्कच्या महापौरांनी सांगितले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये जहाजाचा वरचा भाग पुलावर आदळताना दिसत आहे.

Advertisement

मेक्सिकन नौदलाचे जहाज एका मैत्रीपूर्ण भेटीसाठी न्यूयॉर्कला आले असतानाच ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेवेळी जहाजामधून 250 हून अधिक लोक प्रवास करत असल्याची माहिती न्यूयॉर्क आपत्कालीन संकट व्यवस्थापन एजन्सीने दिली. या घटनेची चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. ब्रुकलिन पुलाच्या डेकची उंची 127 फूट आहे, तर जहाजाच्या टॉवरची (मास्ट) उंची 158 फूट होती. जहाज आणि पुलाच्या डेकच्या उंचीमध्ये सुमारे 31 फूट फरक होता. हेच अपघाताचे कारण बनले. हे जहाज न्यूयॉर्क पियर 17 वरून आइसलँडकडे जात होते.

या अपघातामुळे 142 वर्षे जुन्या ब्रुकलिन पुलाचे मोठे नुकसान झालेले नाही. तथापि, जहाजातील दोघांना प्राण गमवावे लागले. अपघाताचे कारण तपासले जात आहे. ब्रुकलिन ब्रिज 1883 मध्ये बांधण्यात आले होते. ते 1,600 फूट लांब असून दोन दगडी बुरुजांवर उभे आहे. शहराच्या वाहतूक विभागाच्या मते दररोज 1 लाखाहून अधिक वाहने आणि सुमारे 32,000 पादचारी या पुलावरून ये-जा करत असतात.

Advertisement

.