For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावमध्ये मेट्रोच्या बॅरिकेड्समुळे सर्वत्र चर्चा

12:37 PM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगावमध्ये मेट्रोच्या बॅरिकेड्समुळे सर्वत्र चर्चा
Advertisement

बेळगाव : बेळगावमध्ये लवकरच मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल, अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगू लागली आहे. याचे कारण म्हणजे शहरात लावण्यात आलेले मेट्रोचे बॅरिकेड्स. केवळ एक-दोन नाही तर कणबर्गीपासून महांतेशनगर ब्रिजपर्यंत असे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. त्यामुळे खरंच बेळगावमध्ये मेट्रोसाठी काम सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कणबर्गी ते महांतेशनगर कॉर्नरपर्यंत भूमिगत वाहिन्या घालण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी जागोजागी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. या प्रत्येक बॅरिकेडवर मेट्रो असे लिहिण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. ड्रेनेज तसेच इतर वाहिन्या घालण्याचे काम सुरू असताना मेट्रोचे बॅरिकेड्स कसे लावले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत चौकशी केली असता त्यामागचे सत्य समोरआले. बेंगळूर येथील मेट्रोच्या कामासाठी लावण्यात आलेलेच बॅरिकेड्स बेळगावमध्ये लावण्यात आले आहेत. कंत्राटदाराने यावरील मेट्रो हे चित्र न हटवताच ते बेळगावमध्ये लावल्याने संभ्रम निर्माण झाला होता. परंतु या बॅरिकेड्समुळे चर्चा मात्र मेट्रो येणार, अशी सुरू झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.