For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेटा प्रमुख संध्या देवनाथन यांचा राजीनामा

06:35 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेटा प्रमुख संध्या देवनाथन यांचा राजीनामा
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

मेटा इंडियाच्या प्रमुख संध्या देवनाथन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. याच बरोबर त्या आता ओपन एआयमध्ये सामिल होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. जवळपास 10 वर्षांनंतर संध्या यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओपन एआय या नव्या कंपनीमध्ये त्या लवकरच रुजू होणार आहेत. दक्षिण पूर्व आशियाच्या उपाध्यक्ष म्हणून त्या सिंगापूरमधून नवी जबाबदारी सांभाळणार आहेत. सदरच्या ठिकाणी राहून संध्या देवनाथन या आपल्या कामाचा हिशोब एशिया प्रशांत क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक किरण मनी यांना सादर करणार आहेत.

देवनाथन यांच्याकडे दक्षिण-पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलिया येथील ग्राहकांची संख्या वाढविणे तसेच कंपन्यांमध्ये ओपन एआयच्या सेवांचा जास्तीत जास्त वापर वाढविणे. त्याचप्रमाणे इतर कंपन्यांसोबत भागिदारी करणे यासारख्या जबाबदाऱ्या असतील.

Advertisement

संध्यांचा अनुभव

2016 मध्ये संध्या देवनाथन मेटा इंडियामध्ये सामिल झाल्या होत्या. सिंगापूरमध्ये कंपनीची जबाबदारी सांभाळताना 300 कर्मचाऱ्यांचे काम पाहात होत्या. सिंगापूर आणि व्हिएतनाममध्ये कंपनीचा व्यवसाय उभा करण्यासोबत तेथील कर्मचारी संघाला मदत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संध्या देवनाथन यांनी आपल्या कार्यकाळात केले. 2020 मध्ये एशिया प्रशांत क्षेत्रात गेमिंग व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. जगभरातील मोठ्या व्यवसायांपैकी एक व्यवसाय म्हणून गेमिंग व्यवसायाकडे पाहिले गेले. त्यानंतर 2023 मध्ये भारतात त्यांना मेटाच्या प्रमुख बनविले गेले.

Advertisement
Tags :

.