For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओटवणे नरकासुर स्पर्धेत मेस्त्रीवाडी संघ प्रथम

05:45 PM Nov 12, 2023 IST | अनुजा कुडतरकर
ओटवणे नरकासुर स्पर्धेत मेस्त्रीवाडी संघ प्रथम
Advertisement

रमाईनगर द्वितीय तर गावठाणवाडी
तृतीय; चौगुलेवाडी मित्रमंडळाचे आयोजन

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

ओटवणे चौगुलेवाडी मित्रमंडळ आयोजित आणि सामाजिक युवा कार्यकर्ते बबलू गावकर पुरस्कृत नरकासुर स्पर्धेत मेस्त्रीवाडीने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत रमाईनगरने द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक गावठाणवाडीने पटकावला.या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, चौगुलेवाडी मित्रमंडळाचे उमेश गावकर, बबलू गावकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार कांता मेस्त्री, बाळा गावकर, एकनाथ गावकर, मनोज गावकर, आनंद गावकर, तुषार गावकर, विशाल गावकर, प्रभाकर गावकर, गजानन गावकर, सुनील गावकर, प्रथमेश गावकर, प्रमोद गावकर, रामा म्हैसकर, प्रकाश गावकर, आनंद भैरवकर, मंगेश गावकर, उदित गावकर, बंटी गावकर श्रेयस गावकर, ओम गावकर, ऋषिकेश गावकर, प्रणव गावकर, वेदांत गावकर, आदित्य कविटकर, देवेश भैरवकर, विजय गावकर, मंगेश गावकर आदी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त मेस्त्रीवाडीला २०२३ रुपये, द्वितीय रमाईनगर १२२३ रुपये, तृतीय गावठणवाडी ७२३ रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या इतर सहा जणांना प्रत्येकी दोनशे रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले..या स्पर्धेसाठी पंच म्हणून आनंद मेस्त्री, बाळा गावकर, मिलिंद म्हापसेकर, विनायक मेस्त्री, सौ साक्षी कविटकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार महेश चव्हाण यांनी केले.

Advertisement
Tags :

.