बदलापूरातील स्फोटात इन्सुलीतील मेस्त्री कुटुंब गंभीर
03:54 PM Aug 06, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
मयुर चराटकर
बांदा
Advertisement
बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत एका फार्मा कंपनीत सोमवारी पहाटे मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की रिऍक्टरचा 100 किलो वजनाचा एक भाग उडून तब्बल 400 मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन पडला. या चाळीत सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावातील मेस्त्री कुटुंब राहत होते. सदरचा रिऍक्टर पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या या कुटुंबाच्या बेडवर कोसळला. यात घनश्याम कृष्णा मेस्त्री (वय 35) पायावर पडल्याने त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तर त्यांची पत्नी धनश्री हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांची छोटी मुलगी कु. ख्याती हिच्या सुद्धा पायाला दुखापत झाली आहे. घनश्याम यांच्यावर जे .जे रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची पत्नी व मुलगीवर बदलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Advertisement
Advertisement