For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेसाई रसेलचा नवा विक्रम

06:22 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
मेसाई रसेलचा नवा विक्रम
Advertisement

वृत्तसंस्था / मियामी

Advertisement

येथे सुरू असलेल्या ग्रॅन्ड स्लॅम ट्रॅक अॅथलेटिक्स स्पर्धेत अमेरिकेची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती धावपटू मेसाई रसेलने महिलांच्या 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत नवा अमेरिकन विक्रम नोंदविला. या क्रीडा प्रकारात तिने दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जलद वेळ नोंदविली.

महिलांच्या 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत 24 वर्षीय रसेलने 12.17 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान मिळविले. या क्रीडा प्रकारात अमेरिकेच्या नेसाई रसेलने आपल्याच देशाच्या टीया जोन्सला मागे टाकले. जोन्सने या क्रीडा प्रकारात 12.19 सेकंदाचा अवधी घेतला. जमैकाच्या अॅकेरा न्युजेंटने तिसरे स्थान मिळविले. महिलांच्या 100 मी. अडथळा शर्यतीमध्ये 2016 साली अमेरिकेच्या केनी हॅरिसनने नोंदविलेला 12.20 सेकंदाचा अमेरिकन विक्रम मेसाई रसेलने मोडीत काढला. 2022 साली झालेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत नायझेरीच्या टोबी अॅम्युसेनने 12.12 सेकंदाचा विश्व विक्रम केला असून तो अद्याप अबाधीत आहे.

Advertisement

या स्पर्धेत महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत मेलिसा जेफर्सनने 10.75 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान पटकाविले. अमेरिकेच्या टेमारी डेव्हिसने 10.79 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान, तर नायझेरियाच्या ओफीलीने तिसरे स्थान घेतले. पुरुषांच्या 3000 मी. धावण्याच्या शर्यतीत आर्यलंडच्या अॅन्ड्रीव्ह कॉसकोरेनने 8 मिनिटे 17.66 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान पटकाविले.

Advertisement
Tags :

.