For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेस्सी अर्जेंटिनात दाखल

06:06 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेस्सी अर्जेंटिनात दाखल
Advertisement

वृत्तसंस्था, ब्युनोस आयर्स

Advertisement

अर्जेंटिनाचा जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू लायोनेल मेस्सी शुक्रवारी मायदेशात दाखल झाला आहे. नुकत्याच झालेल्या फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेनंतर मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

2022 मध्ये झालेल्या फिफाच्या विश्व चषक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या अर्जेंटिनाचे नेतृत्व मेस्सीने केले होते. निवृत्तीनंतर अर्जेंटिनामध्ये त्याला निरोप देण्यासाठी एक फुटबॉल सामना आयोजित केला आहे. मंगळवारी अर्जेंटिना आणि बेनिन यांच्यात हा मित्रत्वाचा सामना होणार असून मेस्सीचा हा निवृत्तीनंतरचा शेवटचा निरोपाचा सामना राहिल.

Advertisement

Advertisement
Tags :

.