For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदी सरकारचा व्हॉट्सअॅपवर मेसेज; केंद्र सरकार फीडबॅक मागत असल्याने राजकिय वाद उफाळला

06:39 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदी सरकारचा व्हॉट्सअॅपवर मेसेज  केंद्र सरकार फीडबॅक मागत असल्याने राजकिय वाद उफाळला
Advertisement

काँग्रेस संतप्त आचारसंहिता उल्लंघन होत असल्याचा आरोप 

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘विकसित भारत, संपर्क’ नावाच्या व्हॉट्सअॅप अकौंटवरून लोकांच्या मोबाइलवर  मेसेज पाठवून केंद्र सरकार फीडबॅक मागत आहे. आता याच संदेशावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतरही भाजप स्वत:च्या प्रचारासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करत असल्याचा  आरोप काँग्रेसने केला आहे. तर सरकारकडून पाठविण्यात आलेल्या या संदेशात पंतप्रधान मोदींचे एक पत्रही अटॅच असते. सरकारी डाटाबेसचा वापर करून एक राजकीय प्रोप्रेगेंडा चालविला जात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

Advertisement

काँग्रेसच्या केरळ शाखेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅपची पॅरेंट कंपनी मेटाला टॅग करत विकसित भारत संपर्क नावाच्या वेरिफाइड बिझनेस अकौंटवरून लोकांना मेसेज पाठविले जात असल्याचे म्हटले आहे. या संदेशात लोकांकडून फीडबॅक मागण्यात ओत आहे. परंतु यासोबत अटॅच करण्यात आलेले पंतप्रधान मोदींचे पत्र राजकीय प्रोपेगेंडा व्यतिरिक्त अन्य काही नाही. पंतप्रधान मोदी हे याच्या माध्यमातून स्वत:च्या पक्षाचा प्रचार करत आहेत आणि याचा वापर शासकीय डाटाबेस अंतर्गत होतोय. अशा स्थितीत व्हॉट्सअॅपचा देखील राजकारणासाठी गैरवापर होत असल्याचे केरळ काँग्रेसने म्हटले आहे.

केरळ काँग्रेसने सरकारच्या पॉलिसीचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. यात कंपनी कुठलाही राजकीय पक्ष, राजकारणी, राजकीय उमेदवार किंवा राजकीय प्रचारासाठी मेसेजिंग अॅपच्या वापरावर बंदी घालत असल्याचे यात म्हटले गेले आहे.  जर कंपनीचे हेच धोरण असेल तर एक राजकीय नेता प्रोपेगैंडा चालविण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा कसा काय वापर करू शकतो? किंवा भाजपसाठी कंपनीचे वेगळे धोरण आहे का असे प्रश्नार्थक विधान काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना एक पत्र जारी करत त्यांच्याकडून विकसित भारतासंबंधी प्रतिक्रिया मागविल्या आहेत. विकसित भारताच्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी लोकांची साथ आणि सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचमुळे या योजनांसंबंधी लोकांना स्वत:चे विचार मांडावेत असे या संदेशात नमूद करण्यात आले आहे. 2047 पर्यंत देशाला विकसित करण्याचे स्वप्न दाखविणे हा भाजपचा राजकीय प्रचार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

आचारसंहिता लागू झाल्यावरही भाजपच्या नेतृत्वाखील मोदी सरकार करदात्यांच्या पैशांच वापर करून पत्र जारी करत आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर एक लज्ज्जास्पद प्रचाराचा मेसेज प्राप्त होतोय अशी टीका लोकसभेतून बडतर्फ माजी खासदार आणि तृणमूल नेत्या महुआ मोइत्रा यांनी केला आहे. फेब्रुवारी महिन्यात भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी विकसित भारत मोदी की गॅरंटी नावाने व्हिडिओ व्हॅन सादर केली होती. याद्वारे देखील भाजप घोषणापत्राकरता लोकांच्या सूचना मिळवत आहे.

विकसित भारत संपर्क या अकौंटवरून अनेक भारतीय व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना पाठविण्यात आलेल्या संदेशाद्वारे शासकीय योजना आणि धोरणांशी संबंधित सूचन मागविण्यात आल्या आहेत. व्हॉट्सअॅप संदेशासोबत अटॅच पीडीएफ फाइलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक पक्ष असून यात पंतप्रधान आवास योजना, आयुष्मान भारत, मातृ वंदना योजना इत्यादी योजनांचा उल्लेख आहे.

Advertisement
Tags :

.