महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

10:53 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उचगाव मळेकरणी देवीला साकडे घालून समिती उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात

Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

कर्नाटक सरकारचा मराठी माणसावर होणारा जुलमी अत्याचार थोपवण्यासाठी आणि सीमाभागातील जनतेला आपल्या हक्काच्या माय मराठीला न्याय मिळवून देण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. महादेव पाटील एक नाममात्र उमेदवार आहेत. मात्र समितीचा उमेदवार विजयी होणे म्हणजे तमाम मराठी बांधवांचा मोठा विजय आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील यांनी उचगाव येथून प्रचार शुभारंभप्रसंगी व्यक्त केले. शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी जागृत मळेकरणी देवीच्या आमराईतील मंदिरामध्ये मळेकरणी देवीला साकडे घालून आणि पूजा करून बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ तालुक्मयातील समितीनिष्ठ कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील हे मतदारांना मराठीलाच मत द्या आणि मराठीचाच उमेदवार विजयी करा, असे आवाहन केले.

शुक्रवारी सकाळी मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये देवीची पूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार मनोहर किणयेकर, शहर महाराष्ट्र एकीकरण  समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले, रमाकांत कोंडुसकर, लक्ष्मण होनगेकर, अंकुश केसरकर, नगरसेवक शिवाजी डोणकरी, गुणवंत पाटील, आर. के. पाटील, चेतन पाटील, सागर पाटील, श्रीकांत कदम, मनोहर संभाजीचे याबरोबरच अनेक प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी माजी आमदार मनोहर किणयेकर, रमाकांत कोंडुसकर, अॅड. अमर येळ्ळूरकर, माणिक होनगेकर आदिंनी महादेव पाटील यांनाच आपण सर्वांनी मते देऊन विजयी करूया, असे आवाहन आपल्या भाषणांतून केले. उचगाव गावच्या प्रवेशद्वारामध्ये बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांचे आगमन होताच प्रचंड फटाक्मयांची आतषबाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, अशा जोरदार घोषणांनी उचगाव दणाणून सोडले.

उचगावातील प्रमुख मार्गावरून भव्य प्रचार पदयात्रा

मळेकरणी देवीचा आशीर्वाद घेऊन या प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर उचगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन उमेदवार महादेव पाटील यांनी सर्वांच्या उपस्थितीत केले. यानंतर कचेरी गल्ली मार्गे मध्यवर्ती गणेश, विठ्ठल ऊखुमाई मंदिरामध्ये जाऊन त्यांनी पूजन केले. यावेळी जिजामाता बँकेच्या चेअरपर्सन भाविकाराणी जीवन होनगेकर यांनी उचगाव ग्रामस्थांच्यावतीने उमेदवार महादेव पाटील यांचे औक्षण केले. यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून ही भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article