कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गाबीत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 19 जुलै रोजी गुणगौरव सोहळा

03:40 PM Jul 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

वेंगुर्ले तालुका गाबीत समाज संस्थेतर्फे दहावी, बारावी व पदवी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम शनिवार दि. 19 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता साईमंगल कार्यालय वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आलाआहे. वेंगुर्ले तालुक्यातील गाबीत समाजातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी चालू वर्षी जाहीर झालेल्या निकालात दहावीमध्ये 75 टक्के तसेच बारावी आणि पदवी परिक्षेमध्ये 65 टक्के व त्यापेक्षा अधिक जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत, अशा सर्व प्राविण्य संपादन केलेल्यांचा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. या गुणगौरवास पात्र ठरणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थींनी किंवा त्यांच्या पालकांनी वेंगुर्ले तालुका गाबीत समाज या सोशल मिडिया ग्रुपवर संपूर्ण नाव, पत्ता, व मिळालेले गुण हि माहिती लवकरात लवकर दि. 15 जुलै पर्यंत देवून सहकार्य करावे. या संदर्भात अधिक माहितीसाठी समाजाचे अध्यक्ष राजन गिरप मोबा-9423211962 यानंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.वेंगुर्ले साईमंगल कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव सोहळ्यास गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनी व समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ले तालुका गाबीत समाज संघटनेचे राजन गिरप यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article