महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कु. आयुष पाटणकरला गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

04:52 PM Aug 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून देण्यात येणारा 'गुणवंत खेळाडू पुरस्कार' सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीचा माजी विदयार्थी कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर याला जाहीर झाला आहे.राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत कु. आयुष याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवून भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले होते. राज्यस्तरीय स्पर्धेत कु. आयुष याला ४०० पैकी ३७८ गुण मिळाले होते. यापुर्वी दिल्ली आणि भोपाळ येथे झालेल्या शुटिंग असोसिएशनच्या स्पर्धेत कु. आयुष हा राष्ट्रीय खेळाडू म्हणून घोषित झाला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथे हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. त्याच्या या यशाबद्दल सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रदधाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, पर्यवेक्षक श्रीम. जान्हवी सावंत, किडा शिक्षक श्री. भुषण परब, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Tags :
# aayush patankar # sawantwadi # sports award #
Next Article