कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालवण तालुका गाबित समाजतर्फे २२ जून रोजी गुणवंतांचा सत्कार

02:28 PM Jun 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

दहावी आणि बारावी परीक्षा २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील सर्व गाबित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा गुणगौरव समारंभ २२ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रती १० जूनपर्यंत आपआपल्या भागातील गाबित समाज कार्यकारिणी सदस्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर 9405013448 यांनी केले आहे. मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीची गुणगौरव समारंभ नियोजन बैठक गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्थेत आज ३१ मे रोजी पार पडली. नावनोंदणी डॉ. प्रमोद कोळंबकर - अध्यक्ष, पवनकुमार पराडकर - आचरा. आनंद खडपकर - तळाशील. सर्जेकोट/कोळंब/मालवण शहर -भाई कासवकर आणि अनुष्का मालंडकर (धुरीवाडा). नरेश हुले, पूजा सरकारे, दादा वाघ, राधिका कुबल (मेढा-राजकोट). सेजल परब, अन्वेषा आचरेकर आणि भाऊ मोरजे (दांडी).मिथुन मालंडकर आणि संतोष ढोके (वायरी). सहदेव साळगावकर (तारकर्ली-देवबाग). दिक्षा ढोके (भरड). यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव

गाबित समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य, बंदर विकास मंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत घेण्यात आला.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article