For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमित अकॅडमीतर्फे गुणवंतांचा सत्कार

01:15 PM Jul 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
अमित अकॅडमीतर्फे गुणवंतांचा सत्कार
Advertisement

रत्नागिरी -

Advertisement

रत्नागिरी येथील अमित अकॅडेमीत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी एम. एच. सी. ई. टी. परीक्षेत स्पृहणीय यश मिळवले असून त्यांचा अकॅडेमीमार्फत फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाचे इलेक्ट्रिकल शाखेचे प्रमुख डॉ. जयंतजी माने सर, गोगटे कॉलेजचे बायोलॉजी विषयाचे माजी प्राध्यापक़ पाटील सर आणि गणेश मित्रमंडळ, बेलबाग रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. ओंकारजी शेट्ये यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन ह्रद्य सत्कार करण्यात आला.रत्नागिरीतील अमित अकॅडेमीमार्फत ११वी व १२तील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेबरोबरच एम. एच. सी. ई. टी. या स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन करण्यात येतात. अकॅडेमीने दर्जेदार शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण निकालाची उज्ज्वल परंपरा निर्माण केली आहे. यावर्षी एम. एच. सी. ई. टी. परीक्षेत अकॅडेमीच्या सोहम पानगले, सार्थक गोडबोले, सार्थक केळकर, पार्थ मोरे, विशाल सुर्वे, हर्षद चव्हाण, यश तेंडुलकर, स्वरूप रेंडाळकर या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले असून ३० जून रोजी मारुती मंदिर येथील डी. के. पवार हॉलमध्ये त्यांचा डॉ. जयंतजी माने सर, डॉ. पाटील सर आणि श्री. ओंकारजी शेट्ये यांच्याहस्ते ह्रद्य सत्कार करण्यात आला.यावेळी फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. माने सर म्हणाले, ‘‘बारावीनंतर केवळ अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण एवढेच पर्याय नसून अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षण आणि रोजगाराच्या आणि संशोधनाच्याही वेगवेगळ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, त्यांचा लाभ घ्या. पण त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे,’’ हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. आपल्या गुणवंत मुलांचे अकॅडेमीने कौतुक करून सत्कार केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अकॅडेमीचे अभिजित तोडणकर सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर अमित पावसकर सर यांनी सूत्रसंचालन करून आभारही मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.