पदवी अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी आज
पणजी : उच्च शिक्षण संचालनालयाच्या प्रशासकीय अखत्यारितील सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी आज दि. 22 एप्रिल रोजी संबंधित महाविद्यालयांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. संचालनालयाने जारी केलेल्या माहितीनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या महाविद्यालयांना भेट द्यावी लागणार आहे. समुपदेशन आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू होईल. त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत अर्ज केलेला नाही, त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये अर्ज करण्याची संधी देण्यात येईल. त्यासंबंधी तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून संचालनालय आपल्या ‘समर्थ’ या मध्यवर्ती प्रवेश पोर्टलद्वारे प्राथमिक अर्ज प्रक्रिया राबवत आहे, त्यानंतर संबंधित महाविद्यालयांमार्फत गुणवत्ता यादी आणि प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येते.