मेरशी बलात्कार प्रकरणातील जीम मालक अजूनही फरारच
11:01 AM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी: मेरशी येथील कथित बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी व न्यायालयात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवण्याची कायदेशीर प्रक्रिया रविवारी पणजी महिला पोलिसांनी पूर्ण केली आहे. फरार संशयित जीम मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना केली असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
Advertisement
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत संशयित जीम मालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Advertisement
Advertisement