मर्सीडिझ बेंझ इ क्लास भारतीय बाजारात लाँच
किंमत 78 लाखापासून पुढे : अनेक वैशिष्ट्यो सादर
नवी दिल्ली :
लक्झरी कार्सच्या क्षेत्रात कार्यरत मर्सीडिझ बेंझ यांनी आपली नवी इ क्लास ही कार भारतीय बाजारात लाँच केली आहे. सदरच्या गाडीची किंमत 78 लाख रुपये इतकी असणार आहे. तीन मॉडेल कंपनीने सादर केलेली असून यांची डिलीव्हरी याच आठवड्यात केली जाणार आहे.
कंपनीने इ क्लासअंतर्गत इ 200 पेट्रोल, इ 220 डी डिझेल आणि इ 450 4मॅटीक या तीन कार्स सादर केल्या असून त्यांच्या अनुक्रमे किंमती 78 लाख, 81 लाख आणि 92 लाख रुपये असणार आहेत. जुन्या आवृत्तीपेक्षा नव्या इ क्लासची किंमत साधारणपणे 2.5 लाख रुपयांनी महाग आहे.
स्पर्धक कंपनी बीएमडब्ल्यू 5 सिरीजच्या 72 लाखाच्या तुलनेत 5 लाख किंमत जास्त आहे. इ 450 ही गाडी 3.0 लिटर 6 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनसोबत येणार असून 0 ते 100 किमीचा प्रवास 4.5 सेकंदात गाडी करु शकणार आहे. इ 200 डी ही2.0 लिटर, 4 सिलेंडर टर्बो पेट्रोलसोबत येणार असून इ 220 डी 2.0 लिटर 4 सिलेंडर डिझेल इंधनासोबत येणार आहे. या गाडीत एस क्लासप्रमाणे फ्लश डोअर
हँडल्स असतील व एलइडी हेडलाइटस् व एलइडी टेल लॅम्पस दिले गेले आहेत.