For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुरुष विश्वचषक हॉकी : जर्मनी विजेते, अर्जेन्टिनाला कांस्यपदक

06:52 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुरुष विश्वचषक हॉकी   जर्मनी विजेते  अर्जेन्टिनाला कांस्यपदक
Advertisement

वृत्तसंस्था, वावरे (बेल्जियम)

Advertisement

येथील बेल्फियस हॉकी एरिना येथे झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीत स्पेनचा केवळ एकमेव गोलने पराभव करीत जर्मनीने एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषकाचे सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळविण्याचा बहुमान पटकावला.

या सामन्यात स्पेनने वर्चस्व राखत नियंत्रणही ठेवले होते. मात्र सामन्याच्या तिसऱ्या सत्रात जर्मनीला मिळालेल्या दुर्मीळ संधीचे गोलमध्ये रूपांतर करून आघाडी घेतली. मायकेल स्ट्रुथॉफने हा गोल नोंदवला आणि तोच शेवटी निर्णायक ठरला. मिळालेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखत जर्मनीने जेतेपद मिळविले. त्यांचे हे एकंदर चौथे विश्वचषक जेतेपद आहे. या जेतेपदामुळे जर्मनी हा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनताना त्यांनी पाकच्या चार विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Advertisement

उपविजेत्या ठरलेल्या स्पेनने पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. या सामन्यात बॉल पझेशन व संधींच्या बाबतीत बराच काळ स्पेनने वर्चस्व गाजविले. पण जर्मनीची भक्कम व अभेद्य बचावफळी त्यांना भेदता आली नाही. तरीही त्यांनी झुंज चालू ठेवली आणि चमत्कार घडण्याच्या आशेने त्यांनी गोलरक्षकालाही बाहेर काढले. मात्र जर्मनीने आपली पकड मजबूत ठेवत त्यांना संधी मिळू दिली नाही आणि चौथे जेतेपद निश्चित केले.

अर्जेन्टिनाने तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत यजमान नेदरलँड्सचा 2-1 असा पराभव करीत कांस्यपदक मिळविले. त्याआधी अर्जेन्टिनाच्या महिला संघाने नेदरलँड्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव करून जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. अशा प्रकारे अर्जेन्टिनाने दुहेरी यश मिळविले.

Advertisement
Tags :

.