For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धाराशिव, पुणे, सांगलीचे पुरुष व महिला संघ उपांत्य फेरीत

06:04 AM Mar 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
धाराशिव  पुणे  सांगलीचे पुरुष व महिला संघ उपांत्य फेरीत
Advertisement

पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद  व निवड चाचणी खो खो स्पर्धा 2025

Advertisement

प्रतिनिधी/ शेवगाव, अहिल्यानगर

हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पुरुष गटामध्ये पुणे विरुद्ध सांगली, मुंबई उपनगर विरुद्ध धाराशिव तर महिला गटामध्ये धाराशिव विरुद्ध पुणे आणि सांगली विरुद्ध नाशिक असे सामने रंगणार आहेत. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, अहमदनगर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व शेवगाव स्पोर्ट्स बहुउद्देशीय फाउंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान, मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर, शेवगाव येथे हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा खंडोबा क्रिडांगणावर उत्साहात सुरू आहे.

Advertisement

आज सकाळच्या सत्रात पुरुष गटातील उपउपांत्य सामन्यात पुण्याने अहिल्यानगरवर 1 डाव 10 गुणांनी (15-10) मात केली. यामध्ये विजयी संघातर्फे अथर्व देहेण (3 मि. संरक्षण), शुभम थोरात (2.30, 1 मि. संरक्षण व 1 गुण ), साहिल चिखले (1.50 मि. संरक्षण व 3 गुण), सिद्धार्थ पवार (1 मि. संरक्षण व 3 गुण) यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात धाराशिवने ठाण्याचा 2 गुण आणि 2 मिनिटे 50 सेकंद राखून (20-18) पराभव केला. विजयी संघातर्फे विजय शिंदे (1.30, 1.50 मि. संरक्षण व 3 गुण), रोहित चव्हाण (1.20, 1.30 मि. संरक्षण व 4 गुण), सचिन पवार (1.20, 1. 20 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तिसऱ्या सामन्यात सांगलीने सोलापूरचा 2 गुण व 5.30 मि. राखून (14-12) पराभव केला. सांगली संघाकडून मिलिंद चावरेकर (2,1.20 मि. संरक्षण व 2गुण), सागर गायकवाड (1, 1.40 मि. संरक्षण), सौरभ घाडगे (1, 1.50 मि. संरक्षण ), सत्यजित सावंत (1.30, 1.50 मि. संरक्षण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. चौथ्या सामन्यात मुंबई उपनगरने मुंबईचा (18-17) 20 सेकंद राखून 1 गुणाने पराभव केला.

    महिलांचे उपांत्यपूर्व फेरीतील धमाकेदार सामने

महिला गटामध्ये पहिल्या सामना सांगली आणि रत्नागिरी यांच्यात चूरशीचा झाला. सांगलीने 1 गुणाने (13-12) विजय मिळवला. सानिका चाफे (2.30, 1.40 मि. संरक्षण व 3 गुण ), रितिका मगदूम (5 गुण ), प्रतीक्षा बिराजदार (1.40, 2.40 मि, संरक्षण) यांनी सांगलीकडून महत्वाची खेळी केली. दुसऱ्या सामन्यात पुण्याने सोलापूरचा 10-8 असा 1 डाव 2 गुणांनी पराभव केला. त्यात श्वेता वाघ (3.20 मि. संरक्षण), प्रियांका इंगळे (3, 2 मि. संरक्षण व 3 गुण), स्नेहा महाले (2 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात धाराशिवने मुंबईचा 1 डाव 12 गुणांनी (17-5) असा पराभव केला. चौथ्या सामन्यात नाशिकने ठाण्याचा (9-8) 1 गुणांने पराभव केला. दरम्यान, या स्पर्धेतील अंतिम सामने उद्या सायंकाळच्या सत्रात होणार आहेत.

Advertisement
Tags :

.