कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुरुषांनी महिलांना कमी लेखू नये

10:26 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

योग शिबिरप्रसंगी रोटरी साहाय्यक प्रांतपाल रेणू कुलकर्णी यांचे प्रतिपादन

Advertisement

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊन व शास्त्रीनगर पतंजली योगवर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पाटीदार भवन येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे 5.30 वाजता महाशिवरात्रीनिमित्त हवन करण्यात आले. या कार्यक्रमाला रोटरीच्या साहाय्यक प्रांतपाल रेणू कुलकर्णी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना रेणू कुलकर्णी म्हणाल्या, सध्याच्या महिलांना नोकरी, व्यवसाय सांभाळून कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागते. गृहिणी घरासोबतच मुलांचे पालनपोषण, वडीलधाऱ्यांची काळजी घेत असतात. त्यामुळे कुठल्याही पुरुषाने महिलांना कमी लेखू नये, असा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरीचे अध्यक्ष सतीश नाईक, पतंजली योगवर्गाचे जोतिबा भादवणकर, मोहन बागेवाडी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अंजली किनारी यांनी केले. शोभा डोंगरे यांनी परिचय करून दिला. कल्पना रेवणकर व नमिता पाटील यांनी स्वागतगीत सादर केले. विद्या माने यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article