For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फिनलंडच्या बेटावर पुरुषांना नो एंट्री

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
फिनलंडच्या बेटावर पुरुषांना नो एंट्री
Advertisement

जगात अनेक सुंदर जागा आहेत, परंतु फिनलंडचे सुपरशी बेट खरोखरच अनोखे असून याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. या बेटावर पुरुषांच्या प्रवेशावर बंदी असून केवळ महिलाच येथे जाऊ शकतात. हे 8.4 एकरचे खासगी बेट बाल्टिक सागरात फिनलंडच्या दक्षिण किनाऱ्यानजीक रासेपोरीच्या नजीक स्थित आहे. हेलसिंकीपासून केवळ 100 किलोमीटर अंतरावर असलेले हे बेट अमेरिकन उद्योजिका क्रिस्टिना रोथ यांनी 2018 मध्ये खरेदी केले होते. रोथ या माजी टेक सीईओ असून महिलांसाठी एक डिस्ट्रॅक्शन-फ्री झोन तयार करण्याची त्यांची इच्छा होती. येथे कुठलाच अजेंडा नाही, कोणतेच इंटरप्शन नाही, केवळ निसर्गाच्या कुशीत रिचार्ज होण्याची जागा आहे. या बेटावर रॉकी शोर्स, घनदाट जंगल, फिनिश सौना आणि लक्झरी टच असलेले निवासस्थान आहे. महिला नौकेतू येतात आणि शांत वातावरणात पाऊल ठेवतात.

Advertisement

सुपरशी बेटाची खास वैशिष्ट्या म्हणजे येथे ‘नो मेन’ धोरण आहे. हे बेट केवळ 8 अतिथींपुरती मर्यादित आहे. येथे महिला योग, ध्यानधारणा, सैर किंवा केवळ आराम करू शकतात. व्हिस्परिंग पाइन्स आणि जेंटल वेव्सदरम्यान चिंता जणू दूर पळतात. महिलांना सशक्त करणे माझा उद्देश होता. फास्ट-पेड लाइफमध्ये महिला स्वत:ला विसरून जातात, येथे त्या स्वत:शी जोडून घेऊ शकतात असे क्रिस्टिन यांनी म्हटले आहे. 2018-23 पर्यंत हे महिलांचे पॉवरफुल सपेस राहिले. हजारो महिला येथे आल्या, मैत्रिणी झाल्या. परंतु 2023 मध्ये बेट विकले गेले. एका पुरुष शिपिंग एक्झिक्यूटिव्हने हे बेट 1 दशलक्ष युरोपेक्षा अधिक किमतीत खरेदी केले. त्यानंतर सुपरशी ब्रँडच्या स्वरुपात रिलाँच झाले नाही. आताही लोक याला महिलांचे पॅराडाइज असे संबोधितात.

Advertisement

Advertisement
Tags :

.