कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्थानिकांच्या भावना न दुखावता शंभुराजेंचे भव्य स्मारक उभारणार, DCM अजित पवारांची ग्वाही

01:58 PM Apr 28, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

आजपासून स्मारकाच्या प्राथमिक कामाला सुरुवात, स्मारकाच्या चित्रफितीचे सादरीकरण

Advertisement

संगमेश्वर : स्थानिक ग्रामस्थांच्या भावना न दुखावता कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य-दिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारक पाहण्यासाठी हजारो भक्त कसबा गावात येणार असल्याने स्मारक उभारणीत कोणतीही कमतरता राहणार नाही यादृष्टीने तज्ञ वास्तुविशारदांकडून रचनात्मक आराखडा मागवला जाणार आहे. आराखडा पूर्ण झाल्यानंतर स्मारकासाठीचा संपूर्ण निधी मंजूर केला जाईल. येथील पुरातन मंदिरे आणि परिसरसुद्धा विकसित केला जाणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

Advertisement

कसबा येथील कर्णेश्वर मंदिरात रविवारी छत्रपती संभाजी महाराज स्मारक व कसबा परिसर विकाससंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, माजी आमदार सुभाष बने, प्रमोद जठार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, जि. . माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक, रोहन बने, विक्रांत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी गलांडे, पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता इंद्रजीत नागेशकर, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, तहसीलदार अमृता साबळे उपस्थित होते.

टिकाऊ साहित्य वापरण्याची सूचना

कसबा येथील बाळ सरदेसाई यांनी संबंधित जागेविषयी उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली. पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता इंद्रजीत नागेशकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथील भव्य दिव्य स्मारक असेल यासंबंधीची चित्रफीत सादर केली. त्यानंतर सोमवारपासून स्मारक उभारणीपूर्व कामाला सुरुवात करण्याची सूचना संबंधित विभागाला देत पवार पुढे म्हणाले, स्मारकाचे काम जांभा आणि दगडामध्ये काम केले जाईल. स्मारकासाठी स्थानिकही सहकार्य करण्यास तयार आहेत.

येथील 5 एकर जमिनीवर उभ्या राहणाऱ्या या स्मारकामध्ये नदी काठावरील मंदिरे जतन करण्याबरोबर येथील स्मारकाची माहिती देणारे फलक मराठी, इंग्रजी, हिंदी या तीन भाषांमध्ये लावण्यात यावेत. तसेच स्माकासाठी टिकाऊ साहित्य वापरण्यात यावे. नदीचेही काम करू. इतर भागात ग्रीन लॉन लावण्यात येणार आहे. कुणाच्याही भावना न दुखावता येथील कामे करायची आहेत. स्मारकाला दोन प्रवेश असतील. रत्नागिरी जिह्यात जे गड आहेत त्यांच्या प्रतिकृती याठिकाणी दाखविण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले.

कोकणच्या विकासाबद्दल पवारांकडून खंत

श्री देव कर्णेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने कर्णेश्वर मंदिराची माहिती देणारी पुस्तके पवार यांना भेट देण्यात आली. कर्णेश्वर मंदिराचे पावित्र्य जपण्यात यावे. पुरातत्व विभागाला कर्णेश्वर मंदिर जतनासाठी होणारा खर्च दिला जाईल त्यामुळे आता सुरू असलेले काम थांबवून नव्याने चांगल्या प्रकारे काम करण्यात यावे, अशी सूचना पवार यांनी केली. यावेळी कोकणाच्या विकासाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न - उदय सामंत

अदिती तटकरे म्हणाल्या, कसबा येथील सरदेसाई यांच्या वाड्याची प्रतिकृती याठिकाणी दाखविण्यात यावी. आमदार शेखर निकम म्हणाले, कसबा ते श्रृंगारपूर असे पर्यटनस्थळ विकसित करण्यात यावे. नायरी घाट फोडून नायरी-पाटण-सातारा असा जवळचा मार्ग लवकर निर्माण करण्यात यावा.

आमदार भास्कर जाधव यांनी या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य दिव्य प्रतिमा उभारण्यात यावी असे सांगितले. राजेंद्र महाडिक यांनी पुरातन मंदिराची दुऊस्त करण्यात यावी असे सांगत यासंदर्भात सविस्तर निवेदन दिल्याचे सांगितले. दरम्यान, पालकमंत्री म्हणून सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उदय सामंत यांनी केले.

मधमाशांचा हल्ला

आढावा बैठक पार पडल्यानंतर संगमावरील पुरातन मंदिर परिसर पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अधिकारी वर्ग जात असताना सायरन वाजल्यामुळे पुरातन गणेश मंदिराजवळील पिंपळावर बसलेल्या मधमाशांनी हल्ला केला. पवार यांना सुरक्षितरित्या वाहनामार्फत नेण्यात आले. परंतु अन्य काही जणांना मधमाशांनी चावा घेतला. शाल, रुमाल, गोल कॅप डोक्यावर घालत काहींनी आपला बचाव केला.

Advertisement
Tags :
@ratnagiri#ajit pawar#Sangmeshar#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediakonkan newsPolitical News
Next Article