स्मृती मानधनाचे अग्रस्थान कायम
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसी महिलांच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने आपले अग्रस्थान कायम अधिक भक्कम केले आहे. महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड बरोबर झालेल्या सामन्यात तिने 109 धावांची शतकी खेळी करत मानांकनातील आपले अग्रस्थान 828 मानांकन गुणांसह अधिक भक्कम केले आहे.
महिला फलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची अॅस्ले गार्डनर 731 मानांकन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या गार्डनरने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात नाबाद शतक झळकविल्याने तिचे मानांकनातील स्थान 6 अंकांनी वधारले. सप्टेंबर महिन्यातील स्मृती मानधनाने आयसीसीचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कारही यापूवीं घेतला आहे. फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत द.आफ्रिकेची कर्णधार वूलव्हर्ट हिने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडच्या अॅमी जोन्सने 656 मानांकन गुणांसह नववे स्थान मिळविले आहे. भारताच्या प्रतिका रावलने फलंदाजांच्या मानांकन यादीत 564 गुणांसह 27 वे स्थान घेतले आहे. महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील गुरूवारी होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामन्यात प्रतिका रावल दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.
महिलांच्या वनडे गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत इक्लेस्टोन 774 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. अॅलेना किंगने या यादीत पाचव्या स्थानावर झेप घेताना 698 मानांकन गुण घेतले आहेत. किंग आता या मानांकन यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. किंगने ऑस्ट्रेलियाच्या अॅसले गार्डनरला दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर फशेकले. गार्डनरने 689 मानांकन गुण मिळविले आहेत. अष्टपैलुंच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या अॅस्ले गार्डनर 503 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर असून कॅप दुसऱ्या स्थानावर आहे. विंडीजच्या मॅथ्युजने 422 गुणांसह तिसरे तर सदरलँडने चौथे स्थान मिळविले आहे.