For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-रशिया यांच्यात सामंजस्य करार

07:00 AM Mar 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत रशिया यांच्यात सामंजस्य करार
Advertisement

ड्रोन-अंतराळ तंत्रज्ञानात सहाय्य : उत्तर प्रदेशात यूएव्ही प्रयोगशाळा स्थापन होणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

जगभरात ड्रोनच्या वाढत्या वापराला प्रतिसाद म्हणून भारत आणि रशियाने तांत्रिक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. भारत-रशिया इनोप्रॅक्टिका टेक्नॉलॉजी हबने भारतात अत्याधुनिक मानवरहित हवाई वाहन (युएव्ही) आणि उपग्रह प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी शैक्षणिक संस्थांसोबत करार केले आहेत. हा करार भारत आणि रशिया यांच्यातील तांत्रिक भागीदारी अधिक मजबूत करेल. तसेच संरक्षण, अवकाश आणि एआय-आधारित ड्रोन क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढणार आहे. त्याव्यतिरिक्त भविष्यातील संरक्षण आणि नागरी ड्रोन तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता वाढणार आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशातील कानपूरस्थित छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ फाउंडेशन, कलाम एसपीएस रिसर्च सेंटर आणि रशियाच्या जिओस्कॅन ग्रुपने इनोप्रॅक्टिका टेक्नॉलॉजी हबसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारामुळे ड्रोन आणि उपग्रह प्रमाणन अभ्यासक्रमांचाही शुभारंभ झाला. भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी याला द्विपक्षीय सहकार्यातील एक ऐतिहासिक पाऊल म्हटले आहे. कानपूरस्थित विद्यापीठात होणारी प्रयोगशाळेची स्थापना भारत-रशिया तांत्रिक भागीदारीला एक नवीन दिशा देईल. हा उपक्रम डिसेंबर 2025 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान निश्चित केलेल्या द्विपक्षीय तांत्रिक अजेंड्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा करार तांत्रिक विकासाबरोबरच मानवी संसाधन विकासावरही भर देत असल्यामुळे दोन्ही देशांतील तरुणांना प्रगत ड्रोन आणि अवकाश तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे.

सामंजस्य कराराची उद्दिष्ट्यो...

  • भारतातील ड्रोन व अवकाश तंत्रज्ञान अधिक मजबूत करणे.
  • विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक प्रशिक्षण देणे.
  • यूएव्ही डिझाइन, उ•ाण कार्यप्रणाली, डेटा विश्लेषण करणे.
  • भारत-रशिया यांच्यातील तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे.
Advertisement
Tags :

.