कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओटवणेत काका दामले यांचे शैक्षणिक कार्य संस्मरणीय

05:00 PM Apr 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आज कै प्रा. काका दामले यांचा २० वा स्मृतिदिन

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
कै प्रा काका दामले सर्वसमावेशक सक्षम नेतृत्वामुळे आणि सहकाऱ्यांच्या उत्तम पाठबळामुळेच ओटवण्यासारख्या ग्रामीण भागात २८ वर्षांपूर्वी माध्यमिक शिक्षणाची सोय झाली. त्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाअभावी होणारी परवड थांबली. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक कार्य पुढे सुरू ठेवणे हीच काकांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे असे प्रतिपादन ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष मनोहर मयेकर यांनी केले.ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै प्रा. मनोहर ऊर्फ काका दामले यांच्या २० व्या स्मृतिदिन कार्यक्रमात मनोहर मयेकर बोलत होते. यावेळी ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाबाजी गावकर, सदस्य गणपत बिरोडकर, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, शिक्षिका संजिवनी गवस, शिक्षक एकनाथ घोंगडे, एन व्हि राऊळ, पी एम कांबळे, लिपिक शंकर बिरोडकर, कर्मचारी मंगेश गावकर, शरद जाधव, महादेव खेडेकर, मधुकर खरवत आदी उपस्थित होते.यावेळी ओटवणे रवळनाथ विद्यामंदिरचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांनी कै प्रा काका दामले यांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाबरोबरच कष्टालाही महत्त्व दिले. जिवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब न करता कठोर परिश्रम केल्यास यश हमखास मिळते हे त्यांनी दाखवून दिल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी काका दामले यांना आदरांजली वाहुन काका दामले यांच्या आठवणींना उजाळा दिला. कै प्रा काका दामले यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच रवळनाथ विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा मुलगा कु विराज राऊळ या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने काका दामले यांच्या स्मृतिदिनी त्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढून त्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. प्रा काका दामले यांच्या स्मृति स्थळाकडे या पेन्सिल पोट्रेट स्केचचे अनावरण करण्यात आले. काका दामले यांचे त्यांच्या स्मृतिदिनी हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच पाहून उपस्थितांनी कु विराज राऊळच्या कलेचे कौतुक केले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article