For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘डॉक्टर्स डे’निमित्त केएलई हॉस्पिटलमध्ये मेलोडी कार्यक्रम

11:56 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘डॉक्टर्स डे’निमित्त केएलई हॉस्पिटलमध्ये मेलोडी कार्यक्रम
Advertisement

डॉक्टरांनी गीते गाऊन रसिकांना रिझविले

Advertisement

बेळगाव : ‘डॉक्टर्स डे’निमित्त केएलई संगीत महाविद्यालय व केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्यावतीने हॉस्पिटलमध्ये मेलोडी संगीत कार्यक्रम पार पडला. यामध्ये केएलई, जेएनएमसी, कंकणवाडी कॉलेज व यूएसएम-केएलई विभागाच्या सर्व डॉक्टरांनी विविध भाषेतील अजरामर गीते गाऊन उपस्थित रसिकांना रिझविले. यामध्ये डॉ. राजेंद्र भांडणकर, डॉ. ए. एस. गोधी, डॉ. मृत्युंजय बेल्लद, डॉ. सदानंद पाटील, डॉ. बसवराज बिज्जरगी, डॉ. शीतल पट्टणशेट्टी, डॉ. राजेश्वरी कामत, डॉ. उमा शेट्टी, डॉ. दीपिका कर्णम, डॉ. प्रभाकर हेगडे, डॉ. इम्रान, डॉ. पिटके यांनी गाणी सादर केली. यावेळी केएलई हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजशेखर, वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. दयानंद व अन्य डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सुनीता पाटील यांनी केले. संगीता बांदेकर यांनी स्वागत केले. डॉ. दुर्गा नाडकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राजाराम अंबर्डेकर यांनी डॉक्टरांचा सत्कार केला. गायकांना राहुल मंडोळकर व जितेंद्र साबण्णावर यांनी तबला व संवादिनीची साथ केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.