कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेल्जियममध्ये मेहुल चोक्सीला झटका

06:50 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न्यायालयाने फेटाळली जामीन याचिका

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रसेल्स

Advertisement

पंजाब नॅशनल बँकेची जवळपास 13,500 कोटी रुपयांची फसवणूक करत 2018 मध्ये भारतातून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सीची जामीन याचिका बेल्जियम येथील एका न्यायालयाने फेटाळली आहे. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणीनंतर जामीन न देण्याचा निर्णय दिला आहे. यापुर्वी चोक्सीचे भारतीय वकील विजय अग्रवाल यांनी जामीन याचिकेवरील सुनावणीपूर्वी एंटवर्प येथील तुरुंगात चोक्सीची भेट घेतली होती.

भारतीय अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार चोक्सीला मागील आठवड्यात बेल्जियमच्या पोलिसांनी एंटवर्प येथे अटक केली होती. चोक्सी बेल्जियमच्या एका रुग्णालयात उपचार करवून घेत होता, तेथेच त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रत्यार्पणासाठी भारताचे प्रयत्न

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारत प्रयत्न करत आहे. भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीच्या आधारावर बेल्जियम पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत बेल्जियमसोबत मिळून काम करत असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी दिली होती. भारतीय यंत्रणांनी बेल्जियम सरकारला चोक्सीला प्रत्यार्पित करण्याची विनंती केली आहे. भारत आणि बेल्जियम दरम्यान प्रत्यार्पण करार असून यात परस्परांच्या आर्थिक गुन्हेगांराना सुपूर्द करण्याची तरतूद आहे. मेहुल चोक्सी प्रकृती अस्वास्थाच्या आधारावर प्रत्यार्पणाची मागणी फेटाळण्यात यावी असा युक्तिवाद करत आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article