मेहरीन पीरजादा विवाहबद्ध
अभिनेत्री मेहरीन पीरजादाने स्वत:च्या आयुष्यातील एक नवा प्रवास सुरू केला आहे. मित्र अन् परिवाराच्या उपस्थितीत ती विवाहबद्ध झाली आहे. अभिनेत्रीने स्वत:च्या विवाहाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. मेहरीन ही अर्श औलख यांच्यासोबत विवाहबद्ध झाली आहे. मेहरीनच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कॉमेंट्स केल्या आहेत. सोनल चौहान, साक्षी मलिक, अनुराग कश्यप तसेच अंशुला कपूर यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. विवाहाबद्दल इतकी चर्चा होऊन देखील मेहरीनच्या पतीविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्रीने विवाहापूर्वी स्वत:च्या नात्याविषयी पूर्णपणे गुप्तता बाळगली होती.
मेहरीन ही यापूर्वी पीरियड क्राइम थ्रिलर वेबसीरिज ‘सुल्तान ऑफ दिल्ली’ (2023) मध्ये दिसून आली होती. याचे दिग्दर्शन मिलन लूथरिया यांनी केले होते. यात ताहिर राज भसीन, मौनी रॉय, अंजुम शर्मा, विनय पाठक, अनुप्रिया गोयंका, निशांत दहिया आणि हरलीन सेठी हे कलाकार होते.