मेहमी मिस्त्री यांचा एनसीपीएच्या संचालक मंडळाचा राजीनामा
नोएल टाटा यांच्यासोबतच्या संघर्षानंतर टाटा ट्रस्टचाही अगोदरच राजीनामा
नवी दिल्ली :
टाटा ट्रस्टच्या बोर्डातून अलीकडेच बाहेर पडलेल्या मेहली मिस्त्री यांनी आता मुंबईतील प्रतिष्ठित कला केंद्र नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस (एनसीपीए) च्या गव्हर्निंग कौन्सिलचाही राजीनामा दिला आहे. सूत्रांनी सांगितले की, मिस्त्राr यांच्या जागी टाटा ट्रस्टचे ट्रस्टी विजय सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिस्त्राr हे सर दोराबजी टाटा ट्रस्टचे नामांकित सदस्य होते आणि त्यांनी या कला केंद्रात जहांगीर एच जहांगीर, प्रमित झवेरी यांसारख्या ट्रस्टच्या इतर प्रतिनिधींसोबत काम केले होते.
टाटा समूहाशी संबंधित संस्थांना मिस्त्री यांचा निरोप
टाटा ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतर लगेचच मिस्त्री यांचा राजीनामा आला. एनसीपीए कौन्सिलचे आणखी एक सदस्य, के.एन. सुंटुक (अध्यक्ष), नोएल टाटा (उपाध्यक्ष), वृंदा खटाऊ आणि महाराष्ट्र सरकारचे नामांकित सदस्य. मिस्त्राr यांना सर दोराबजी टाटा ट्रस्टचे नामांकित सदस्य बनवण्यात आले. सूत्रांनी सांगितले की मिस्त्राr यांच्या राजीनाम्यामुळे टाटा समूहाशी संबंधित संस्थांमधून त्यांची निवृत्ती पूर्ण झाली आहे.
गेल्या महिन्यात टाटा ट्रस्ट्समधून विश्वस्तांनी राजीनामा दिला. रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्री यांनी गेल्या महिन्यात टाटा ट्रस्ट्च्या तीन ट्रस्ट्समधून राजीनामा दिला. यामध्ये सर रतन टाटा ट्रस्ट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि बाई हीराबाई जे.एन. टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन ट्रस्ट यांचा समावेश आहे. त्यांनी 4 नोव्हेंबर रोजी एका पत्रात याबद्दल माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी, टाटा ट्रस्टच्या प्रमुख धर्मादाय शाखांमध्ये मिस्री यांच्या पुनर्नियुक्तीबाबत मतदान झाले. नोएल टाटा, वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह या तीन विश्वस्तांनी त्यांच्या पुनर्नियुक्तीच्या विरोधात मतदान केले. मिस्त्राr यांचा कार्यकाळ 28 ऑक्टोबर रोजी संपत होता.
एनसीपीए मुंबईची स्थापना जेआरडी टाटा यांच्या पुढाकाराने 1969 मध्ये झाली. टाटा ट्रस्ट आणि कला क्षेत्रातील प्रमुख संरक्षकांच्या सहकार्याने बनवण्यात आले. 1970 मध्ये उद्घाटन झाले. हे एक जागतिक दर्जाचे बहु-स्थळीय कला संकुल आहे, जे भारताच्या सांस्कृतिक परंपरांना प्रोत्साहन देते आणि त्यांचे जतन करते. जागतिक नाट्या, संगीत आणि नृत्य निर्मितीचे आयोजन करते. आज ते भारतातील सर्वात प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्था आहे.