For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेहली मिस्त्रींचा टाटांच्या फॅमिली ऑफिसमधून राजीनामा

07:00 AM Jul 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेहली मिस्त्रींचा टाटांच्या फॅमिली ऑफिसमधून राजीनामा
Advertisement

टाटा ट्रस्टमधून काढून टाकल्यानंतर काही महिन्यांनी उचललेले पाऊल : टाटा समूहापासून दुरावा वाढला

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

मेहली मिस्त्री यांनी त्यांच्या कौटुंबिक गुंतवणूक कार्यालय ‘आरएनटी असोसिएट्स“च्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. टाटा ट्रस्ट्मधून काढून टाकल्यानंतर काही महिन्यांनी मिस्त्री यांनी हा राजीनामा दिला आहे. या त्यांच्या निर्णयामुळे टाटा ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित संस्थांपासून मेहली मिस्त्री यांचे अंतर आणखी वाढले आहे. मेहली मिस्त्री मार्च 2023 मध्ये आरएनटी असोसिएट्सच्या संचालक मंडळात संचालक म्हणून सामील झाले होते. संचालक मंडळाला लिहिलेल्या आपल्या राजीनामा पत्रात मिस्त्री यांनी लिहिले आहे, ‘माझ्या इतर कामांमुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे, मी 1 जुलै 2026 पासून आरएनटी असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदाचा राजीनामा देत आहे.“ मिस्त्री यांनी 30 जून रोजी संचालक मंडळाला हे पत्र लिहिले.

Advertisement

टाटा ट्रस्ट्मधून काढून टाकल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. नोव्हेंबर 2025 मध्ये मिस्त्री यांना टाटा ट्रस्ट्मधून काढून टाकल्यानंतर हा राजीनामा आला आहे. टाटा ट्रस्ट्स ही टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये बहुसंख्य हिस्सेदारी असलेली संस्था आहे. मिस्त्राr यांनी ट्रस्टमधून स्वत:ला काढून टाकण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांकडे आव्हान दिले आहे. सध्या केवळ एका संलग्न ट्रस्टच्या संचालक मंडळात समाविष्ट आरएनटी असोसिएट्स सोडल्यानंतरही मेहली मिस्त्राr ‘टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट“च्या संचालक मंडळाचे सदस्य झालेत. हा ट्रस्ट टाटा ट्रस्ट्च्या सर्वात श्रीमंत संलग्न कंपन्यांपैकी एक मानला जातो. तथापि, आता त्यांना समूहाच्या प्रमुख व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या निर्णयांमधून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.

आरएनटी असोसिएट्स काय आहे, त्याचे सध्याचे सदस्य ?

आरएनटी असोसिएट्सची स्थापना मार्च 2009 मध्ये झाली. याच्या माध्यमातून रतन टाटा नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करत असत. सध्या याच्या संचालक मंडळात रतन टाटा यांच्या दोन बहिणी शिरीन जिजीभॉय आणि दीना जिजीभॉय, टाटा सन्सचे वरिष्ठ कार्यकारी जमशेद पोंचा आणि टाटा सन्सचे जनरल काउन्सिल सिद्धार्थ शर्मा यांचा समावेश आहे. आरएनटी असोसिएट्सचे मुख्य कार्य लाभांश आणि सल्लागार सेवांद्वारे कमाई करणे हे आहे. मार्च 2023 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात, कंपनीचा एकूण महसूल रु.36 कोटी होता, ज्यापैकी पूर्वीची कमाई लाभांशातून येत होती. या गुंतवणूक कार्यालयाने पेटीएम, ओला आणि ऑनलाइन ज्वेलरी ब्रँड ब्लूस्टोनसह सुमारे दोन डझन स्टार्टअप्समध्ये लहान गुंतवणूक केली आहे.

 नवीन भागधारकांची रचना तयार

रतन टाटा यांनी एक नवीन भागधारकांची रचना तयार केली. सुरुवातीला, रतन टाटा आणि त्यांचे आणखी एक विश्वासू सहकारी, दिवंगत आर. के. कृष्ण कुमार हे या कंपनीचे दोन मुख्य भागधारक होते. ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या मृत्यूपूर्वी, त्यांनी 2022 मध्ये ‘रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन“ आणि ‘रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट“ यांची स्थापना केली. आता या दोन्ही संस्था आरएनटी असोसिएट्सच्या भागधारक आहेत. आरटीइएफच्या संचालक मंडळात टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांचा समावेश आहे, तर RऊTिं मध्ये प्रमित झवेरी यांच्यासारख्या दिग्गजांसोबतच टाटा ट्रस्ट्चे विद्यमान अध्यक्ष नोएल टाटा यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.