गुलाम नबी आझादांशी मेहबुबा मुफ्तींची लढत
काश्मीरच्या अनंतनागमधून निवडणूक लढवणार
वृत्तसंस्था/ श्रीनगर
पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच रविवारी पक्षाने त्या अनंतनागमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. तीन उमेदवारांची घोषणा करतानाच नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देण्याचे आवाहन मेहबुबा मुफ्ती यांनी केले. पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती याआधीही अनंतनागमधून खासदार राहिल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे आणखी एक माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हेही अनंतनाग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे दोन दिग्गजांमध्ये थेट लढत होणार आहे.
मेहबुबा मुफ्ती या अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. पीडीपी युथ विंगचे अध्यक्ष वहीद पारा हे श्रीनगरमधून आणि बारामुल्ला मतदारसंघातून माजी राज्यसभा सदस्य फैयाज मीरचे उमेदवार असतील, असे पीडीपी संसदीय समितीचे अध्यक्ष सरताज मदनी यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले. पीडीपीने जम्मू लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मेहबुबा मुफ्ती यांचा सामना नॅशनल कॉन्फरन्सचे मियां अल्ताफ अहमद आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) गुलाम नबी आझाद यांच्याशी होईल. खोऱ्यातील लोकसभेच्या तीन जागांसाठी भाजपने अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
आम्ही काश्मीरमधील तीनही जागा लढवू आणि जम्मूमध्ये काँग्रेसला पाठिंबा देऊ. काश्मीरमध्येही युती करण्याचा प्रयत्न करताना फाऊख अब्दुल्ला यांना जागा जाहीर करण्यासाठी प्रोत्साहित केले होते, परंतु नॅशनल कॉन्फरन्सने जाहीर घोषणा केल्यामुळे आम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले, नॅशनल कॉन्फरन्सने त्यांच्याशी सल्लामसलत न करता उमेदवार जाहीर केल्याने मला दु:ख होत आहे. यामुळे पीडीपी कार्यकर्त्यांची प्रचंड निराशा झाली आहे. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सला आम्ही आमची ताकद दाखवू. असे पत्रकार परिषदेदरम्यान मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.
काश्मिरी, गुज्जर, बकरवाल किंवा पहाडी त्या सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेस त्यांना पाठिंबा देत असो वा नसो, आमचा जनतेवर पूर्ण विश्वास आहे, असेही पीडीपी अध्यक्षा म्हणाल्या. मेहबूबा मुफ्ती यांनी अनंतनाग आणि राजौरी पूंछमधील जनतेला पीडीपीला बळकट करण्यासाठी आणि जम्मू-काश्मीरचे प्रश्न लोकसभेत मांडण्याची संधी देण्यास