मेगन फॉक्सला कन्यारत्न
अभिनेत्री मेगन फॉक्सचे जगभरात चाहते आहेत. मेगन ही खासगी आयुष्यावरून चर्चेत असते. मेगनची तुलना अनेदा अँजेलिना जोलीसोबत केली जाते. अभिनेत्री मेगन फॉक्स आणि रॅपर मशीन गन केलीने विभक्त झाल्याच्या काही महिन्यांनी स्वत:च्या पहिल्या अपत्याचे स्वागत केले आहे. प्रसिद्ध गायक मशीन गन केलीचे खरे नाव कोल्सन बेकर असून त्याने चाहत्यांसोबत ही खूशखबर शेअर केली आहे. एका छायाचित्रात रॅपर स्वत:च्या मुलीचा हात पकडून असल्याचे दिसून येते. मेगन फॉक्स चौथ्यांदा आई झाली आहे. परंतु मशीन गन केली आणि तिचे हे पहिलेच अपत्य आहे. मेगनला पूर्वीच्या नात्यांपासून तीन मुलगे आहेत. पूर्वाश्रमीचा पती ब्रायन ऑस्टिन ग्रीनपासून तिला नोआ, बोधी आणि जर्नी असे तीन पुत्र आहेत. मेगन आणि केलीने 2022 मध्ये एंगेजमेंट केली होती. तर 2024 मध्ये दोघेही वेगळे झाले हेते. दोघांनी नाते संपुष्टात आणण्यापूर्वी लवकरच अपत्याचे स्वागत करणार आहोत अशी घोषणा केली होती. अपत्याच्या पालनपोषणासाठी जोडपं स्वत:च्या नात्यांमध्ये सुधारणा करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मुलीच्या जन्मामुळे चाहते दोघांच्या नात्यात नवे वळण येऊ शकते, असा अंदाज वर्तवत आहेत.