For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गोवा वाचवा’ जनआंदोलन पणजीत उद्या व्यापक बैठक

01:00 PM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘गोवा वाचवा’ जनआंदोलन पणजीत उद्या व्यापक बैठक
Advertisement

पणजी : विद्यमान स्थितीत गोव्याची पर्यावरणीय आणि संरचनात्मक दृष्ट्या चाललेली हानी आणि होणारा ऱ्हास पाहून उद्बिग्न झालेले निवृत्त मुख्य न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी जनआंदोलन उभारण्यासाठी दिलेल्या हाकेला अनुसरून उद्या दि. 6 रोजी पणजीत खास बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा संस्थेच्या परिषदगृहात दुपारी 3.30 वाजता ही बैठक होणार आहे. आपल्या सुवर्णमयी गोव्याचा सध्या निर्दयी पद्धतीने विध्वंस सुरू आहे. ही परिस्थिती पाहून रिबेलो यांनी हल्लीच अत्यंत व्यतिथ मनस्थितीत दैनिक तरुण भारतमधून गोमंतकीयांना आवाहन केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून पुढील दिशा ठरविण्यासाठी ही बैठक होणार आहे. या बैठकीत प्रस्तावित पीपल्स चार्टरवर चर्चा, सूचनांचा समावेश आणि भावी पिढ्यांसाठी राज्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने कृती आराखडा तयार करणे यावर बैठकीत व्यापक चर्चा होणार आहे.

Advertisement

बैठकीचे विषय 

  • डोंगर विकसित करण्यावर बंदी घालणे.
  • जमीन रुपांतरण कायदे रद्द करणे.
  • अनधिकृत प्रकल्पांना अडविणे.
  • खोटे अहवाल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे.
  • बेकायदेशीर सीआरझेड संरचना काढून टाकणे.
  • मांडवी नदीतून कॅसिनो हटविणे
Advertisement
Advertisement
Tags :

.