तालुका म. ए. समितीच्या नियंत्रण घटक समितीची बैठक
ग्रामीण-यमकनमर्डी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मध्यवर्ती म. ए. समितीच्या सदस्यपदी निवड
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नियंत्रण घटक समितीची बैठक रविवार दि. 29 रोजी मराठा मंदिर मंगल कार्यालयात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. मध्यवर्ती म. ए. समितीने आवाहन केल्याप्रमाणे बेळगाव ग्रामीण मतदारसंघ व यमकनमर्डी मतदारसंघातील तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यासाठी नावे देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या बैठकीत यावर विचार विनिमय करून नावे ठरविण्यात आली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून माजी आमदार मनोहर किणेकर, ॲड. एम. जी. पाटील, बी. एस. पाटील, बी. डी. मोहनगेकर, सुरेश राजूकर, किरण मोटणकर, बी. बी. देसाई, रामचंद्र मोदगेकर, मोनाप्पा पाटील, विठ्ठल पाटील, लक्ष्मण होनगेकर, आर. एम. चौगुले, संतोष मंडलिक, मनोहर संताजी, मल्लाप्पा गुरव, आर. के. पाटील, पियूष हावळ, डी. बी. पाटील, प्रशांत पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. प्रसाद सडेकर, यमकनमर्डी मतदारसंघातून मनोहर हुंदरे, शिवाजी कुट्रे, लक्ष्मण पाटील, मनोहर हुक्केरीकर यांची निवड करण्यात आली. तसेच या बैठकीत नागरी समस्यांवरील चर्चा केली.
या बैठकीला माजी आमदार मनोहर किणेकर, ॲड. एम. जी. पाटील, लक्ष्मण होनगेकर, विठ्ठल पाटील, मोन्नाप्पा पाटील, रामचंद्र मोदगेकर, मनोहर संताजी, मल्लाप्पा गुरव, संतोष मंडलिक, आर. के. पाटील, बी. एस. पाटील, दीपक पावशे, बी. डी. मोहनगेकर, बी. बी. देसाई, आर. आय. पाटील, कमल मनोळकर, तुळसा पाटील, मनोहर हुंदरे, अनिल पाटील, लक्ष्मण पाटील, रामचंद्र कुद्रेमणीकर, बाळासाहेब फगरे, नारायण सांगावकर, दीपक आंबोळकर, भरमा देसूरकर, यल्लाप्पा रेमाणाचे, महेंद्र जाधव आदी नियंत्रण घटक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.