कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्लेत 21 जानेवारीला शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा

03:26 PM Jan 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे शहरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवार दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता स्वामिनी मंगल कार्यालय वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपकभाई केसरकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अँड. सौ. निता कविटकर, जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यात वेंगुर्ले शहरातील सर्व शिवसेना शाखाप्रमुखांचा सन्मान, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती मिळालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार तसेच शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करणाऱ्यांचा गौरव आणि उपस्थित प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यक्रमास वेंगुर्ले शहरातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्याने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम, युवक शहर प्रमुख संतोष परब, महिला शहर संघटक अँड. सौ.श्रध्दा बावीस्कर-परब व महिला अल्पसंख्याक शहर संघटक शबाना शेख यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat news # vengurla #
Next Article