For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चैत्रयात्रेनिमित्त जोतिबा डोंगरावर सासनकाठी धारकांची बैठक

12:36 PM Mar 24, 2025 IST | Pooja Marathe
चैत्रयात्रेनिमित्त जोतिबा डोंगरावर सासनकाठी धारकांची बैठक
Advertisement

अडथळा केल्यास परवाना रद्दः उंची व जाडी मर्यादित ठेवाः मद्यपान केल्याचे आढळल्यास कारवाईः खोबरे वाटी न उधळता तुकडे करुन उधळावे

Advertisement

कोल्हापूरः (जोतिबा डोंगर)

महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथील जोतिबाची चैत्री महायात्रा १२ एप्रिल रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील पोलीस चौकीमध्ये उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली सासनकाठीधारकांची बैठक झाली. यात्रेत अडथळा निर्माण करणाऱ्या सासनकाठ्याधारकांचा जाग्यावरच परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सासनकाठीची उंची व जाडी मर्यादित ठेवण्याचा आदेश दिला. जे सासनकाठीधारक मद्यपान करतील त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान भक्तांनी खोबरे वाटी तशीच न उधळता त्याचे तुकडे करुन उधळावे. वाटी लागून भक्त जखमी होतात. असही यावेळी सांगण्यात आले.
गेल्या वर्षी चैत्र यात्रेत एक मानाची उंच सासनकाठी मिरवणुकीवेळी पडली होती. त्यामुळे यात्रेतील सर्व यंत्रणा ठप्प झाली होती. त्यामुळे यंदा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सासनकाठींची उंची मर्यादित ठेवा व या यात्रा पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन शिंगटे यांनी केले.

Advertisement

या बैठकीस पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, जोतिबा देवस्थान इन्चार्ज ऑफिसर धैर्यशील तिवले, सहाय्य पोलीस निरीक्षक कैलास कोडग, यांच्या प्रमुख उपस्थितीत सासनकाठीधारकांची बैठक पार पाडली. यावेळी १०८ मानाच्या सासनकाठीधारकांच्या प्रतिनिधींच्या अडचणी ऐकण्यात आल्या. त्यावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले.

चैत्र यात्रेमध्ये सासनकाठी भाविकांचे प्रमुख आकर्षण असते तसेच हा सोहळा सासनकाठीमुळे नयनरम्य व उत्साहाचा केंद्रबिंदू असतो त्यामुळे हा सासनकाठी सोहळा चांगल्या प्रकारे कोणताही गालबोट न लागता व्यवस्थित पार पाडण्यासाठी ही बैठक घेण्यात येते. त्यामुळे सर्व सासनकाठीधारकाने जोतिबा यात्रेत सासनकाठीचे नियोजन काटेकोरपणे करावे या यात्रेच्या सोहळ्यात आनंदाने सहभागी होऊन प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. यामध्ये कोणताही कसूर चालणार नाही, असे जोतिबा सासनकाठी धारकांच्या बैठकीत शिंगटे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.