For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राघव चड्ढा अन् खलिस्तान समर्थकाची भेट

06:38 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
राघव चड्ढा अन् खलिस्तान समर्थकाची भेट
Advertisement

वाद उभा ठाकला : भाजपविरोधी ब्रिटनच्या खासदार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यावर आता भाजपने आम आदमी पक्षावर फुटिरवादी शक्तींच्या समर्थनाचा आरोप केला आहे. केजरीवाल हे केवळ भ्रष्टाचारात सामील आहेत असे नाही तर त्यांचा पक्ष फुटिरवाद आणि खलिस्तान समर्थकांशी जोडला गेलेला असल्याचा आरोप भाजपने केला आहे.  आप राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्या लंडन दौऱ्यावर भाजप नेते अमित मालवीय यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Advertisement

भारतात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावरही राघव हे लंडनमध्ये असणे हैराण करणारे आहे. राघव आणि ब्रिटिश खासदार प्रीत गील यांची भेट धक्कादायक आहे. मालवीय यांनी स्वत:च्या सोशल मीडिया हँडलवर एक छायाचित्र शेअर केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल याप्रकरणी स्पष्टीकरण देणार का अशी विचारणा मालवीय यांनी या भेटीसंबंधी केली आहे.

खलिस्तान आणि फुटिरवादाचे उघड समर्थन करणाऱ्या ब्रिटनच्या महिला खासदार प्रीत आणि राघव यांची भेट पाहता आम आदमी पक्ष देशविरोधी घटकांना समर्थन करत असल्याचे स्पष्ट होते असा दावा भाजप नेत्याने केला आहे.

भारतविरोधी कारवायांसाठी फंडिंग

आम आदमी पक्षाच्या नेत्यांशी निगडित अनेक प्रश्न असून त्यावर कुठलीच उत्तरे मिळत नाहीत. ब्रिटनमध्ये लेबर पार्टीच्या खासदार प्रीत गिल उघडपणे खलिस्तान फुटिरवादाचे समर्थन करतात. तसेच खलिस्तानासाठी युनायटेड किंग्डमध्ये त्यांनी निधी जमविण्याचे काम केले असल्याचे भाजपने निदर्शनास आणून दिले आहे. प्रीत यांनी लंडनमधील इंडिया हाउसबाहेर झालेल्या हिंसक निदर्शनांकरता आर्थिक निधी पुरविला होता. तसेच भारताच्या विरोधात अनेक सोशल मीडिया पोस्ट केल्या होत्या असे मालवीय यांनी म्हटले आहे.

दिल्लीच्या आरोग्य सेवांवर प्रश्नचिन्ह

ब्रिटिश खासदार प्रीत या मोदीविरोधी तसेच हिंदूविरोधी कंटेंट शेअर करत असतात. राघव चड्ढा हे डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लंडन येथे गेले असल्याची माहिती मिळाली आहे. अशा स्थितीत आप खासदार डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लंडन येथे जात असेल तर दिल्लीतील आरोग्य सेवांच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहणे स्वाभाविक आहे. आरोग्य सेवांमध्ये क्रांतिकारी बदलांवरून दिल्ली सरकारचे दावे पोकळ असल्याचा दावा मालवीय यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.