For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीजिंगमध्ये क्वाड देशांच्या राजदूतांची बैठक

06:24 AM Jan 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
बीजिंगमध्ये क्वाड देशांच्या राजदूतांची बैठक
Advertisement

अमेरिकेच्या मुत्सद्द्याने जारी केले छायाचित्र

Advertisement

वृत्तसंस्था/ बीजिंग

क्वाड देशांच्या राजदूतांनी चीनची राजधानी बीजिंगमध्ये बैठक घेतली आहे.  ही बैठक चीनमधील अमेरिकेच्या दूतावासात झाली असून यात अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपानचे राजदूत सामील झाले. बैठकीनंतर अमेरिकेचे राजदूत डेव्हिड पर्ड्यू यांनी सोशल मीडियावर बैठकीचे छायाचित्र जारी केले. क्वाड एक स्वतंत्र आणि मुक्त हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राला कायम राखण्यासाठी एक चांगली शक्ती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

बीजिंगमध्ये क्वाड देशांच्या राजदूतांना भेटून आनंद झाला. चारही देशांदरम्यान संबंध स्थिर आणि मजबूत आहेत असे अमेरिकेच्या राजदूताने नमूद केले आहे. तर भारतीय दूतावासाने यासंबंधी कुठलीच टिप्पणी केलेली नाही. तर चीनकडूनही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. चीन हा क्वाड समुहाचा टीकाकार आहे. यापूर्वी चीनने क्वाड बैठकांवर प्रतिक्रिया देताना समूह राजकारणात सामील होणे आणि गटांमधील संघर्षाला विरोध करत असल्याचे म्हटले होते. चीन क्वाडला स्वत:च्या सुरक्षेसाठी धोका मानतो. परंतु क्वाड कुठल्याही देशाच्या विरोधात नाही तसेच हा संरक्षण समूह नसल्याचे क्वाड देशांनी अनेकदा स्पष्ट पेले आहे.

मागील वर्षी जानेवारी महिन्यात क्वाड देशांच्या विदेश मंत्र्यांची बैठक पार पडली होती. याच्या प्रतिक्रियेनंतर चीनने देशांदरम्यान सहकार्यात कुठल्याही त्रयस्थ पक्षाला लक्ष्य करण्यात येऊ नये अशी टिप्पणी केली होती. समूह राजकारण, गटांमधील संघर्ष हा स्थायी शांतता आणि सुरक्षा आणणार नाही. तसेच हे आशिया-प्रशांत आणि पूर्ण जगात शांतता तसेच स्थिरतेसाठी उपयुक्त नसल्याची भूमिका चीनने मांडली होती.

Advertisement
Tags :

.