For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा उमेदवार उभा करण्याचा ठराव

05:40 PM Oct 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा उमेदवार उभा करण्याचा ठराव
Advertisement

सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत शेतकरी उमेदवार उभा करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीच्या बांदा येथील कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक रविवारी पार पडली. या बैठकीचे आयोजन सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी विधानसभा निवडणुकीत शेतकरी उमेदवार उभा करण्याचा ठराव या बैठकीत चर्चेत आला.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, इतर संघटनांचे पदाधिकारी, आणि कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते. सुमारे ५० प्रतिनिधी शेतकऱ्यांनी या चर्चेत भाग घेतला. बैठकीचे उद्घाटन माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश गावडे यांनी केले. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि हितासाठी शेतकरी उमेदवार उभा करणे अत्यावश्यक आहे.

Advertisement

श्री. विलास सावंत यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आढावा घेतला आणि सन २०१७ पासून सुरू असलेल्या लढ्याबाबत माहिती दिली. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी शासन दरबारी कुणीही पोटतिडकीने मांडल्या नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा स्वतःचा प्रतिनिधी निवडून आणणे गरजेचे आहे.दोडामार्ग तालुका शेतकरी संघाचे अध्यक्ष श्री. संजय देसाई यांनी मतदारसंघातील परिस्थितीवर भाष्य करत शेतकऱ्यांचा उमेदवार उभा करण्याचे समर्थन केले. विरोधकांचे अस्तित्व असूनही, मतदारांची निष्ठा आणि शेतकऱ्यांचा एकजूटपणा या उमेदवाराच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे ते म्हणाले. नारायण गावडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना एकत्रित येऊन, शेतकरी हितासाठी उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले. माजी सरपंच श्री. प्रवीण परब यांनी आदर्श उमेदवार कोणत्या गुणधर्मांनी युक्त असावा, यावर सखोल मार्गदर्शन केले.

सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी ठामपणे निर्णय घेतला की, कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमिषांना बळी न पडता शेतकऱ्यांचा उमेदवार उभा केला जाईल. दोन दिवसांत इतर १३ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोअर कमिटीची स्थापना केली जाईल, आणि त्यानंतर उमेदवाराची घोषणा करण्यात सर्व उपस्थितांनी बैठकीच्या शेवटी एकजुटीने लढा देण्याचा संकल्प केला, आणि शेतकरी हितासाठी उमेदवार निवडून आणण्याच्या निर्धाराने  सूतोवाच करण्यात आले. सदर बैठकीस श्री. आकाश नरसुले - खजिनदार अशोक सावंत - उपाध्यक्ष, दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळबागायतदार संघ, श्री. दिवाकर म्हावंळणकर - संस्थापक, सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनी, श्री. गुरुनाथ नाईक, श्री. जनार्दन नाईक सदस्य, श्री. शिवाजी गवस - झोळंबे, संजय लाड- अध्यक्ष वीज ग्राहक संघटना, श्री. तुकाराम म्हापसेकर - कोलगाव, श्री. गोपाळ करमळकर - पाडलोस, श्री. प्रणव नाडकर्णी - निरवडे, श्री. लक्ष्मण देसाई कळणे, श्री. अशोक सावंत - आयनोडे, श्री. निलेश परब आरोस, श्री. प्रवीण परब - कुंब्रल, श्री. विठ्ठल मोरुडकर, श्री. सत्यवान देसाई - कुडासे, श्री. स्वप्निल सावंत - डिंगणे, श्री. गुरुनाथ नाईक आरोस, श्री. इंद्रसेन गावंड - पाडलोस, श्री. संदीप सुखी, श्री. दीपक गावडे - दाणोली, श्री. नंदकुमार गवस - डोंगरपाल, श्री. सुहास सावंत - डिंगणे, श्री. चंद्रशेखर देसाई - शिरवल, श्री. सखाराम आसवेकर - रोणापाल, श्री. आनंद परब - मडूरे, श्री. प्रकाश मांजरेकर डिंगणे, श्री. नारायण गावडे झोळंबे, भीमराव देसाई कळणे आदी बैठकीस हजर होते. श्री. प्रवीण परब यांनी बैठकीस हजर राहिलेल्यांचे आभार मानून बैठकीची सांगता झाली

Advertisement
Tags :

.