For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इनफ इज इनफ’ ची रविवारी कांदोळीत सभा

05:10 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘इनफ इज इनफ’ ची रविवारी कांदोळीत सभा
Advertisement

पणजी : न्या. फर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभ झालेली ‘इनफ इज इनफ’ ही चळवळ बार्देश तालुक्यात गती घेत असून तेथील पहिली जाहीर सभा येत्या 10 मे रोजी कांदोळी येथे होणार आहे. त्यावेळी राज्यभरातील लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. संघटनेचे उत्तर गोवा प्रभारी प्रेमानंद दिवकर यांनी काल मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेतून हे आवाहन केले आहे. संघटनेच्या पणजी कार्यालयात आयोजित या परिषदेस फ्रान्सिस कुएलो आणि देविदास आमोणकर हे सदस्यही उपस्थित होते. न्या. रिबेलो यांच्या चळवळीस आतापर्यंत सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Advertisement

त्याच चळवळीचा भाग म्हणून आता बार्देश तालुक्यात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 रोजी सिकेरी कळंगुट येथे नोस्सा दे सिन्होरा चॅपेलच्या चौकात सायं. 5 वाजता ही सभा होणार आहे, अशी माहिती दिवकर यांनी दिली. या सभेत न्या. रिबेलो यांच्यासह बार्देश तालुक्यातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. ही चळवळ अशीच पुढे नेऊन गोव्यात एक सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास दिवकर यांनी व्यक्त केला. येत्या काही दिवसांमध्ये सत्तरी आणि तिसवाडी तालुक्यांमध्येही सभा होणार आहेत. त्यानंतर रिबेलो हे स्वयंसेवा संघटना तसेच कलाकार समुदायाच्या भेटी घेणार आहेत, अशी माहिती कुएलो यांनी दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.