For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मत्स्य धोरणासाठी २३ रोजी मुंबईत बैठक

03:59 PM Jul 21, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मत्स्य धोरणासाठी २३ रोजी मुंबईत बैठक
Advertisement

-मत्स्य विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती ; सर्व सागरी आमदारांना निमंत्रण

Advertisement

प्रतिनिधी
रत्नागिरी
पावसाळी अधिवेशनात झालेल्या चर्चेनुसार मच्छीमार बांधवांच्या अडचणी आणि मत्स्य धोरणासंदर्भात २३ जुलै रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सायंकाळी ६ वाजता मत्स्यविकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण समिती अध्यक्ष राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस राज्यातील सर्व सागरी आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे.पावसाळी अधिवेशनात बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीविरोधात भाजप आमदार नितेश राणे आणि ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जोरदार आवाज उठवत कडक कारवाईची मागणी केली होती. त्या अनुषंगाने झालेल्या चर्चेवेळी मुनगंटीवार यांनी मत्स्य व्यवसायासंदर्भात लवकरात बैठक आयोजित केली जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार २३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय होणार, याकडे राज्यातील मच्छीमारांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.