सेंटकॉम प्रमुख अन् आयडीएफ प्रमुखांची बैठक
ग्राउड ऑपरेशन पूर्वी चर्चा : इराणसंबंधी प्लॅनची आखणी
इराण युद्ध चिघळले असताना अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून ती आगामी दिवसांमध्ये या युद्धाची दिशा निश्चित करू शकते. अमेरिकेचे सेंट्रल कमांड म्हणजेच सेंटकॉमचे प्रमुख अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी इस्रायलमध्ये पोहोचून तेथे इस्रायली डिफेन्स फोर्सचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल एयाल जमीर यांच्याशी चर्चा केली आहे.
बैठकीत काय घडले?
बैठकीत मुख्य स्वरुपात दोन मुद्द्यांवर चर्चा झाली, मध्यपूर्वेत जारी युद्धाची वर्तमान स्थिती आणि पुढील रणनीतिवर विचारविनिमय झाला आहे. दुसरीकडे इराणच्या शस्त्रास्त्रनिर्मितीच्या क्षमतेला रोखण्यावर मतप्रदर्शन करण्यात आले. इराण भविष्यात पुन्हा क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र निर्मिती करण्याच्या स्थितीत असू नये हे अमेरिका आणि इस्रायल सुनिश्चित करू इच्छितात.
ग्राउंड ऑपरेशनची तयारी
अमेरिकेचा संरक्षण विभाग म्हणजेच पेंटागॉन इराणमध्ये अनेक आठवड्यांपर्यंत चालणाऱ्या ग्राउंड ऑपरेशनची योजना तयार करत असताना ही बैठक झाली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतल्यास अमेरिकेचे सैन्य त्वरित एक दीर्घ ग्राउंड ऑपरेशन्ससाठी तयार असावे म्हणून ही तयारी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत हे युद्ध बहुतांश करून हवाई हल्ल्यांपुरमी मर्यादित राज्हिले. 28 फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या या अभियानात 900 हून अधिक हल्ले झाले असून इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेले आहेत. परंतु ग्राउंड ऑपरेशनची तयारी पाहता हे युद्ध आणखी एक धोकादाक वळणावर पोहोचण्याची शक्यता आहे.
पुढे काय होणार?
ट्रम्प ग्राउंड ऑपरेशनचा आदेश देणार की नाही हे सध्या निश्चित नाही. परंतु ही बैठक आणि पेंटागॉनच्या तयारींमधून अमेरिका सर्व परिस्थितीसाठी स्वत:ला तयार ठेवत असल्याचे स्पष्ट आहे. आगामी काळात हे युद्ध जमिनीवर सुरू होते का एखादा कूटनीतिक मार्ग निघतो यावर जगभराच्या नजरा लागून राहिल्या आहेत.